• मेष:-
    कामे मनाजोगती पार पडतील. क्षुल्लक कारणांवरून चिडचिड वाढू शकते. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. इतरांचा सल्ला विचारात घेताना सावध राहावे. सजावटीच्या वस्तू खरेदी कराल.
  • वृषभ:-
    करमणुकीत अधिक वेळ घालवाल. सहृदयतेने विचार कराल. जुगारातून आर्थिक कमाई होईल. दिवस आनंदात घालवाल. तरलपणे विचार कराल.
  • मिथुन:-
    घरातील गोष्टी उत्तम प्रकारे संभाळाल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न असेल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. सर्वांशी प्रेमळपणे वागाल. चांगले गृहसौख्य लाभेल.
  • कर्क:-
    सर्वांशी सलोख्याचे संबंध जोपासाल. भावंडांच्या भेटी घेता येतील. मनाची संवेदनशीलता दाखवाल. सहसाला चांगला वाव मिळेल. विविध विषयात रुची दाखवाल.
  • सिंह:-
    आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्याल. कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल. आपले मत गोड शब्दांत मांडावे. व्यावसायिक लाभ चांगला होईल. आवडीचे पदार्थ चाखाल.
  • कन्या:-
    आपले प्रभुत्व दाखवाल. मनाची द्विधावस्था टाळावी. कामाचा काहीसा गोंधळ उडेल. रागावर नियंत्रण ठेवावे. खर्च करतांना विचार करावा.
  • तूळ:-
    मानसिक व्यग्रता जाणवेल. स्वभावात चिरचिरेपणा येईल. मानापमानाच्या गोष्टी मनावर घेऊ नका. पित्तविकाराचा त्रास जाणवेल. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत.
  • वृश्चिक:-
    गप्पांचा फड जमवाल. तुमच्या शब्दाला वजन असेल. कामात तत्परता दाखवाल. डावपेच खेळण्यात यशस्वी व्हाल. गोष्टी चटकन जाणून घ्याल.
  • धनु:-
    कामाचा दर्जा सुधारेल. उत्तम व्यावसायिक लाभ होईल. सामाजिक वजन वाढेल. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. कामाची धांदल उडेल.
  • मकर:-
    सामाजिक कामात हातभार लावाल. परोपकाराची जाणीव ठेवून वागाल. धार्मिक ग्रंथ वाचाल. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.
  • कुंभ:-
    लपवाछपवीकडे अधिक लक्ष राहील. मनाची चंचलता जाणवेल. अचानक धनलाभाची शक्यता. काही गोष्टी अकस्मात घडतील. वरिष्ठांची मर्जी संपादन करावी.
  • मीन:-
    वादाला तोंड फुटणार नाही याची काळजी घ्यावी. वैवाहिक सौख्याकडे लक्ष द्यावे. उत्तम संभाषण साधाल. कुशलतेने वागाल. बौद्धीक छंद जोपासता येईल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर