• मेष:-
    प्रेमसंबंध सुधारतील. करमणुकीवर भर द्याल. सर्वांशी आनंदाने वागाल. घरातील कामाची दगदग जाणवेल. जवळचे नातेवाईक भेटतील.
  • वृषभ:-
    सर्व बाबी चांगल्या प्रकारे जाणून घ्याल. चर्चेत आवडीने भाग घ्याल. तांत्रिक कामात प्रगती कराल. भावंडांना कामात मदत कराल. सामाजिक जाणीवेतून कामे कराल.
  • मिथुन:-
    मध्यस्थीचे काम कराल. कमिशनमध्ये फायदा होईल. व्यावहारीक बुद्धिमत्ता वापरावी. बोलताना भान विसरू नये. कामातील खाचाखोचा जाणून घ्याव्यात.
  • कर्क:-
    तत्परतेने कामे कराल. फार चिकित्सा करू नका. भावनिक विचार कराल. कौटुंबिक जबाबदारी व्यवस्थित पार पाडाल. सुसंगत शब्दांची जोड घ्यावी.
  • सिंह:-
    आपला रुबाब दाखवाल. धीटपणे वागाल. मागचापुढचा विचार करावा लागेल. खर्चाचे भान राखावे. दृढनिश्चय करावा.
  • कन्या:-
    वादात अडकू नये. काही गोष्टी योग्यवेळीच बोलाव्यात. क्षणिक गोष्टींचा लाभ घ्याल. गैरसमजुतीमुळे मानसिक स्वास्थ्य खराब होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • तुळ:-
    चांगला आर्थिक लाभ होईल. तुमचा मान वाढेल. सामाजिक कामात रस घ्याल. मौल्यावान वस्तू खरेदी कराल. कष्टावर अधिक भर द्याल.
  • वृश्चिक:-
    सामाजिक दर्जा उंचावेल. सत्तेचा अधिकार गाजवाल. महत्त्वकांक्षा वाढीस लागेल. विरोधकांकडे लक्ष द्यावे. निषेध दर्शविताना विचार करावा.
  • धनु:-
    इतरांपुढे आदर्श ठेवाल. स्वभावात मानीपणा आणू नये. सतत खटपट कराल. प्रवासात काळजी घ्यावी. मानापमानाच्या प्रसंगात अडकू नका.
  • मकर:-
    काही कामांना पुरेसा वेळ द्यावा. तब्बेतीची हयगय करू नका. हातातील कामात चिकाटी धरून ठेवावी लागेल. पोटाचे विकार जाणवू शकतात.
  • कुंभ:-
    ठाम निश्चय कराल. उच्च राहणीची आवड दर्शवाल. जोडीदाराला लाभ होईल. क्षुल्लक कारणांकडे दुर्लक्ष करावे. भागादारीतील मतभेद दूर करावेत.
  • मीन:-
    कामाचा उरक वाढेल. हातात काही अधिकार येतील. कार्यपद्धतीत बदल कराल. मुलांना कामात मदत कराल. सकारात्मक विचार करावेत.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर