मेष
आज व्यावसायिक दृष्टीने चांगला दिवस आहे. चांगल्या संधी उपलब्ध होतील. चांगल्या संधीची शहानिशा करुन दिवसाची सुरुवात करावी. लक्ष्मी अष्टकाचे पठण करावे.
आजचा रंग – निळा
वृषभ
साधारण दिवस. वरिष्ठांशी, ज्येष्ठांशी सामंजस्याने वागावे. वादाचे वाईट परिणाम दीर्घकाळ भोगावे लागतील. सावधानतेने दिवस घालावा. देवाजवळ तुपाचा दिवा लावून लक्ष्मीअष्टक म्हणावे.
आजचा रंग- निळा
मिथुन
संमिश्र दिवस. प्रसंग, परिस्थिती, व्यक्ती कुणालाही गृहीत धरू नये. व्यवसायात आणि नोकरीत सर्वांची मते जाणून घेऊन निर्णय घ्यावे. ओम श्री क्लीम लक्ष्मै नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – पिवळा
कर्क
अधिकारी वर्गासाठी उत्तम दिवस. तुम्ही जर अधिकारी पदावर असाल तर अनेक गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील. विद्यार्थ्यांना अडचणी सोडविण्यासाठी सहकार्य लाभेल. महिलांना आनंददायी दिवस असणार आहे. ओम विश्वकर्मने नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग- निळा
सिंह
आज चंद्राचे भ्रमम तुळ राशीमध्ये आहे. व्यावसायिकांना चांगला योग आहे. वैवाहिक जीवनात सुसंवादाचे योग आहेत. मल्टी नॅशनल कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांसाठी चांगले योग आहेत. ओम हरये नमः मंत्राचा जप करणे.
आजचा रंग- निळा
कन्या
प्रसिद्धिचे योग आहे. कामांचे कौतुक होईल. विद्यार्थ्यांना उत्साहवर्धक ग्रहदशा आहे. स्त्रियांना मनाजोगा दिवस जाईल. आप्तेष्टांच्या भेटीगाठी होतील. नवीन वस्तू खरेदीचे योग आहेत. ओम क्लीं श्री नमः बीज मंत्राचा जप करणे.
आजचा रंग – पिवळा
तुळ
आज सकाळपासूनच चंद्राचे भ्रमण तुळ राशीत असणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून विरुद्ध ग्रहदशेत असलेली तुळ रास आज उत्साहात असणार आहे. ओम विश्वकर्मने नमः या मंत्राचा जप करणे.
आजचा रंग पिवळा
वृश्चिक
आज सकाळपासूनच चंद्राचे भ्रमण तुळ राशीत असणार आहे. योग्य निर्णयासाठी सहकार्याची मदत घ्यावी लागेल. स्वतः सर्व निर्णय घेऊ नये. गुरू मार्गदर्शन लाभेल. वरिष्ठांची मर्जी राहील. कालभैरव अष्टक म्हणावे.
आजचा रंग – पिवळा
धनु
दगदगीचा दिवस असणार आहे. कदाचित प्रवासात त्रास होऊ शकतो. आज कामाच्या जबाबदाऱ्या वाढतील. सहकाऱ्यांना मदत करावी लागेल. कुलस्वामिनी स्त्रोत म्हणावे.
आजचा रंग – नारंगी
मकर
आज सकाळपासूनच चंद्राचे भ्रमण तुळ राशीत राहणार आहे. अधिकारी वर्गासाठी आजचा दिवस शुभ संकेत घेऊन येणारा असेल. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेच्या तयारी योग्य दिवस. अडीअडचणी सोडवता येतील. ओम श्रीं महालक्ष्मैं नमः या मंत्राचा जप करणे.
आजचा रंग – निळा
कुंभ
आज सकाळपासूनच चंद्राचे भ्रमण तुळ राशीत असणार आहे. त्यामुळे हा दिवस भाग्यकारक आहे. गेली काही दिवस कामे करता आली नाही ती मार्गी लागतील.
आजचा रंग – पिवळा
मीन
आज सकाळपासूनच चंद्राचे भ्रमण तुळ राशीत असणार आहे. साधारण दिवस. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. प्रवासांत वाहनांची काळजी घ्यावी. हनुमान चालिसाचे पाठ करावेत.
आजचा रंग – केशरी
– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu