मेष

दुर्गा कवचाचे पाठ करावे. आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. नवीन योजनांचा लाभ होईल. जुनी येणी वसूल करण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करावा. व्यवसाय, नोकरीमध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. वरिष्ठांची मर्जी राहील.
आजचा रंग –आकाशी

वृषभ

ॐ आदि गुरवे नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. व्यावसायिक निर्णय योग्य ठरतील. ग्रहांच्या अनुकूलतेमुळे स्थिरता प्राप्त होईल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग –निळा

मिथुन

ग्रामदैवतेचे स्मरण करावे. आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. आर्थिक निर्णय जपून घ्यावेत. वादविवाद टाळावेत. कमोडिटी मार्केट, शेअर्सशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी. पाणी, शेतीशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांना अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग – करडा

कर्क

ॐ श्री आदि गुरवे नमः मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. नोकरीमधील बदल, पगार वाढ यांसारखे प्रश्न मार्गस्थ होतील. सर्वांचे सहकार्य लाभेल. वाहन सौख्य लाभेल.
आजचा रंग –नारंगी

सिंह

कुलस्वामिनीचे स्तोत्र पठण करावे. आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. अधिकारी वर्गासाठी अनुकूल ग्रहमान आहे. वरिष्ठांची मर्जी राहील. राजकारण, सामाजिक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत व्यक्तिंसाठी अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये वाढ करू शकाल. नवीन योजना राबविता येतील.
आजचा रंग -जांभळा

कन्या

ग्रामदैवतेचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. नवीन कामांची सुरूवात करू शकाल. आर्थिक नियोजन उत्तम राहील. कमोडिटी मार्केट, शेअर्स, शेतीशी निगडीत व्यावसायिकांसाठी ग्रहांची अनुकूलता आहे. परदेशाशी निगडीत व्यापार, व्यवसाय करणाऱ्यांसाठी अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग –हिरवा

तुळ

ॐ अदभ्यो नमः जप करून दिवसाला सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. प्रवास जपून करावे. प्रकृतीची काळजी घ्यावी. मोठे आर्थिक निर्णय घेत असताना चर्चा करावी. जमीन, लोखंडाशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांनी दक्षता बाळगावी. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग -जांभळा

वृश्चिक

ॐ श्री महालक्ष्मे नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. व्यावसायिक आणि कौटुंबिक सौख्य लाभेल. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. कौटुंबिक कलह कमी होतील. स्थिरता प्राप्त होईल.
आजचा रंग –गुलाबी

धनु

ॐ अदभ्यो नमः या मंत्राचा ११ वेळा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी. कुणालाही गृहित धरून कामाचे नियोजन करू नये. प्रवास जपून करावेत. आर्थिक गुंतवणूक करीत असताना सावध रहावे. मोठे आर्थिक धाडस करू नये.
आजचा रंग – लाल

मकर

ॐ अदभ्यो नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. महत्त्वकांक्षी योजनांचे नियोजन करावे. अनेक चांगल्या संधी उपलब्ध होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. संतती विषयक अडीअडचणी सोडवू शकाल.
आजचा रंग –निळा

कुंभ

ॐ क्लीं श्री नमः मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. बांधकाम व्यावसायिकांसाठी लाभाचा दिवस. व्यावसायिक निर्णय योग्य ठरतील. नोकरदार मंडळींना प्रतिष्ठेचे योग आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. वरिष्ठांची मर्जी राहील.
आजचा रंग- ऑफ व्हाइट

मीन

पशुपक्षांना अन्नदान करावे. आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. नोकरदार मंडळींना प्रवासाचे योग संभवतात. मोठया जबाबदारीला सामोरे जावे लागू शकते. व्यावसायिक स्पर्धेला खंबीरपणे तोंड देऊ शकाल. भावंडांच्या गाठीभेटी होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.
आजचा रंग –पांढरा

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

Story img Loader