- मेष:-
आपली छाप पाडण्यात यशस्वी व्हाल. दिवस मनाजोगा व्यतीत कराल. घरातील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. वरिष्ठांची मर्जी संपादन करावी. कमिशन मधून कमाई कराल. - वृषभ:-
मानसिक चंचलता जाणवेल. मनातील नसत्या चिंता काढून टाकाव्यात. जोडीदाराची बाजू जाणून घ्यावी. मौल्यवान वस्तू खरेदी कराल. घरात अधिकारी व्यक्तींची ऊठबस होईल. - मिथुन:-
जोडीदाराविषयी मनातील शंका दूर साराव्यात. भागीदारीत सलोख्याचे वातावरण ठेवावे. उत्तम व्यावसायिक लाभ संभवतो. अवास्तव अपेक्षा मनात बाळगू नका. मतभेदापासून दूर रहा. - कर्क:-
कामात चंचलता आड आणू नका. कामाच्या पद्धतीत वारंवार बदल करू नका. परोपकाराची जाणीव ठेवावी. नातेवाईकांना सढळ हाताने मदत कराल. हाताखालील लोकांची उत्तम साथ मिळेल. - सिंह:-
कामानिमित्त प्रवास करावा लागेल. विलंबावर मात करावी. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. कामाची अचूक दखल घेतली जाईल. बौद्धिक छंद जोपासाल. - कन्या:-
अचानक धनलाभ संभवतो. एकाचवेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका. छुप्या शत्रूंवर विजय मिळवता येईल. विरोधकांची तोंडं बंद होतील मुलांचे साहस वाढेल. - तूळ:-
उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. प्रेम सौख्यात वाढ होईल. भागिदारीतून चांगला लाभ होईल. बौद्धिक ताण जाणवेल. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. - वृश्चिक:-
बोलतांना भान राखावे. कौटुंबिक जबाबदारी वाढीस लागेल. खर्चाला आवर घालावी लागेल. पराक्रमाला चांगला वाव मिळेल. मित्रांचा गोतावळा जमवाल. - धनु:-
जास्त चौकसपणा दाखवाल. प्रगतीला योग्य दिशा मिळेल. हातून चांगले लिखाण होईल. सरकारी कामे वेळेत पूर्ण करता येतील. काही गोष्टींचा पुनर्विचार करावा. - मकर:-
जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. चिकाटी सोडून चालणार नाही. जबाबदारी योग्यप्रकारे हाताळावी. धाडसी शब्द वापराल. अतिचिकित्सा करू नका. - कुंभ:-
स्पष्ट बोलण्यावर भर द्याल. गोष्टी चटकन लक्षात घ्याल. धूर्तपणे वागण्याकडे कल राहील. फार हट्टीपणा करू नका. कामात तत्परता दाखवावी. - मीन:-
उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. कागदपत्रांची योग्य छानणी करावी. जामिनकीच्या व्यवहारात सावधानता बाळगावी. गूढ गोष्टींकडे ओढ वाढेल. प्रवासाची आवड पूर्ण होईल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
आणखी वाचा
आजचे राशीभविष्य, शुक्रवार, २८ फेब्रुवारी २०२०
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन
First published on: 28-02-2020 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi friday 28 february 2020 aau