- मेष:-
आपली छाप पाडण्यात यशस्वी व्हाल. दिवस मनाजोगा व्यतीत कराल. घरातील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. वरिष्ठांची मर्जी संपादन करावी. कमिशन मधून कमाई कराल. - वृषभ:-
मानसिक चंचलता जाणवेल. मनातील नसत्या चिंता काढून टाकाव्यात. जोडीदाराची बाजू जाणून घ्यावी. मौल्यवान वस्तू खरेदी कराल. घरात अधिकारी व्यक्तींची ऊठबस होईल. - मिथुन:-
जोडीदाराविषयी मनातील शंका दूर साराव्यात. भागीदारीत सलोख्याचे वातावरण ठेवावे. उत्तम व्यावसायिक लाभ संभवतो. अवास्तव अपेक्षा मनात बाळगू नका. मतभेदापासून दूर रहा. - कर्क:-
कामात चंचलता आड आणू नका. कामाच्या पद्धतीत वारंवार बदल करू नका. परोपकाराची जाणीव ठेवावी. नातेवाईकांना सढळ हाताने मदत कराल. हाताखालील लोकांची उत्तम साथ मिळेल. - सिंह:-
कामानिमित्त प्रवास करावा लागेल. विलंबावर मात करावी. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. कामाची अचूक दखल घेतली जाईल. बौद्धिक छंद जोपासाल. - कन्या:-
अचानक धनलाभ संभवतो. एकाचवेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका. छुप्या शत्रूंवर विजय मिळवता येईल. विरोधकांची तोंडं बंद होतील मुलांचे साहस वाढेल. - तूळ:-
उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. प्रेम सौख्यात वाढ होईल. भागिदारीतून चांगला लाभ होईल. बौद्धिक ताण जाणवेल. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. - वृश्चिक:-
बोलतांना भान राखावे. कौटुंबिक जबाबदारी वाढीस लागेल. खर्चाला आवर घालावी लागेल. पराक्रमाला चांगला वाव मिळेल. मित्रांचा गोतावळा जमवाल. - धनु:-
जास्त चौकसपणा दाखवाल. प्रगतीला योग्य दिशा मिळेल. हातून चांगले लिखाण होईल. सरकारी कामे वेळेत पूर्ण करता येतील. काही गोष्टींचा पुनर्विचार करावा. - मकर:-
जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. चिकाटी सोडून चालणार नाही. जबाबदारी योग्यप्रकारे हाताळावी. धाडसी शब्द वापराल. अतिचिकित्सा करू नका. - कुंभ:-
स्पष्ट बोलण्यावर भर द्याल. गोष्टी चटकन लक्षात घ्याल. धूर्तपणे वागण्याकडे कल राहील. फार हट्टीपणा करू नका. कामात तत्परता दाखवावी. - मीन:-
उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. कागदपत्रांची योग्य छानणी करावी. जामिनकीच्या व्यवहारात सावधानता बाळगावी. गूढ गोष्टींकडे ओढ वाढेल. प्रवासाची आवड पूर्ण होईल.या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन कराया बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन कराAlready have an account? Sign inसर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठीसबस्क्रिप्शनचे फायदेहजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आजचे राशीभविष्य, शुक्रवार, २८ फेब्रुवारी २०२०
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन
First published on: 28-02-2020 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi friday 28 february 2020 aau