• मेष:-
    मनाची विशालता दाखवाल. कलेला पोषक वातावरण मिळेल. वाचनाची आवड जोपासाल. चांगली कल्पनाशक्ती लाभेल. गायन कलेला योग्य दिशा मिळेल.
  • वृषभ:-
    काही कामे कमी श्रमात पार पडतील. सांपत्तिक दर्जा सुधारेल. वारसाहक्काची कामे निघतील. रेस, सट्टा यातून धनलाभ संभवतो. स्त्रियांना आरोग्याची काळजी घ्यावी.
  • मिथुन:-
    एकमेकांचे विचार जाणून घ्याल. भागीदारीत चांगला फायदा होईल. जोडीदाराच्या शांत स्वभावाची जाणीव होईल. एकमेकातील एकोपा वाढेल. पत्नीची कर्तव्यदक्षता दिसून येईल.
  • कर्क:-
    काही गोष्टी होण्यास पुरेसा वेळ द्यावा. आळशीपणा दूर करावा लागेल. नातेवाईकांची मदत मिळेल. व्यसनांपासून दूर राहावे. खाण्याची पथ्ये पाळावीत.
  • सिंह:-
    काहीशी व्यवहारी भूमिका घ्याल. कलेचा आनंद घ्याल. आत्मिक आनंद शोधाल. निसर्गाच्या सानिध्यात रमून जाल. कलात्मक दृष्टिकोन ठेवाल.
  • कन्या:-
    एकमेकांना मदत करण्यात आनंद मानाल. उत्तम गृहसौख्य मिळेल. चांगले वाहन सौख्य लाभेल. कामातून समाधान मिळेल. प्रेम संबंध सुधारतील.
  • तूळ:-
    जबाबदारीची जाणीव ठेवावी. कामात उत्साह जाणवेल. अघळपघळ गप्पा मारल्या जातील. जवळचा प्रवास चांगला होईल. नवीन मैत्री जोडाल.
  • वृश्चिक:-
    काही कामे जास्त वेळ घालवतील. योग्य नियोजनावर भर द्यावा. अडथळ्यातून मार्ग काढावा. तुमचा अंदाज बरोबर येईल. शारीरिक श्रम वाढतील.
  • धनु:-
    नातेवाईकांचे प्रश्न सामोरे येतील. प्रवासात अधिक काळजी घ्यावी लागेल. खर्चाचे योग्य नियोजन करावे. काही गोष्टी बदलाव्या लागतील. अनाठायी खर्च होऊ शकतो.
  • मकर:-
    काही गोष्टी गुप्त ठेवाल. मानसिक शांतता राखण्याचा प्रयत्न करावा. धार्मिक कामात मदत कराल. कोर्टाची कामे लांबणीवर पडतील. भांडणात अडकू नये.
  • कुंभ:-
    चैनीच्या वस्तू खरेदी कराल. मनातील आकांक्षा पूर्ण होतील. दिवस आनंदात जाईल. सामाजिक कार्यास हातभार लावाल. कौटुंबिक गोष्टीत अधिक लक्ष घालावे.
  • मीन:-
    नवीन कामे हाती येतील. काही शुभ घटना घडतील. आर्थिक मान सुधारेल. कलेला नवीन पाठबळ मिळेल. तुमचा दर्जा सुधारेल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर