मेष

अधिकाऱ्यांशी सुसंवाद राहील. कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल. नवीन धाडसी योजना आखण्यास, राबविण्यास उत्तम दिवस आहे. पशुपक्षांना अन्नदान करावे.
आजचा रंग – पोपटी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वृषभ

आजचा दिवस संमिश्र प्रतिसादाचा असेल. प्रकृतीची काळजी घ्यावी. पोटाचे, पचनाचे विकार होण्याची शक्यता आहे. आर्थिक कामे असतील तर ती उद्या करावीत. ओम क्लीं श्रीं नमः मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – हिरवा

मिथुन

नोकरदारांसाठी आजचे चंद्राचे भ्रमण लाभदायक ठरणार आहे. संध्याकाळी चंद्र मकर राशीत प्रवेश करेल. तो पर्यंत सर्व महत्त्वाची कामे भेटीगाठी उरकून घ्यावी. आजचा दिवस दगदगीचा असू शकतो. ओम अदभ्यो नमः हा जप करावा.
आजचा रंग – निळा

कर्क

आज संमिश्र योगाचा दिवस आहे. त्यामुळे कुठलाही निर्णय एकट्या घाईघाईत घेऊ नये. सल्ला मसलत करुनच निर्णय घ्यावेत. संभ्रम मनात असेल तर ज्येष्ठांशी चर्चा करावी. ओम अदभ्यो नमः या मंत्राचा ११ वेळा जप करावा.
आजचा रंग – हिरवा

सिंह

आज संध्याकाळपासून चंद्राचे भ्रमण मकर राशीतून होणार आहे. संमिश्र फळे देणारा दिवस आहे. आज शेअर बाजार, कमोडिटी मार्केटमध्ये व्यवहार करणाऱ्या व्यक्तींनी सावधपणे निर्णय घ्यावे, मोठी गुंतवणूक उलाढाल करू नये. ओम श्री महालक्ष्मै नमः ११ वेळा जप करावा.
आजचा रंग – पिवळा

कन्या

आज चंद्राचे भ्रमण दिवसा धनु आणि संध्याकाळनंतर मकरेत असणार आहे. त्यामुळे आज दिवसा कुठलेही निर्णय घेऊ नये. कामांची आखणी करावी पण अंमलबजावणी पुढे ढकलावी. स्त्रियांनी प्रकृती सांभाळावी. ओम अदभ्यो नमः जप करुन दिवसाला सुरुवात करणे.
आजचा रंग – हिरवा

तुळ

हा आठवडा तुळेच्या व्यक्तींना शुभ आहे. अधिकाऱ्यांसाठी शुभ दिवस आहे. बढतीसाठी प्रयत्न करावेत. जुन्या कामांचा पाठपुरावा करावा. ग्रामदैवतेचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – पिवळा

वृश्चिक

आज संध्याकाळी चंद्र मकर राशीत प्रवेश करणार आहे. हे भ्रमण कौटुंबिक स्वास्थाचे असणार आहे. व्यवसायात प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते. विद्यार्थ्यांच्या कला गुणांचे कौतुक होऊ शकते. कुलस्वामिनी स्त्रोत्राचे पाठ करणे.
आजचा रंग – पोपटी

धनु

आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील, अनेक जुनी कामे मार्गी लावू शकाल. नियोजनात रहाल तर साडेसातीचा प्रभाव जाणवणार नाही. प्रकृतीची काळजी घ्यावी. प्रवास सावधपणे करावा. वेगावर नियंत्रण ठेवणे. ओम श्री आदि गुरवे नमः मंत्राचा जप करणे.
आजचा रंग –  नारंगी

मकर

आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत असणार आहे, परंतु संध्याकाळी मकर राशीत प्रवेश करणार आहे. संमिश्र दिवस जुन्या कामांचा पाठपुरावा करणे, नवीन योजनांची संबंधित व्यक्तिंशी चर्चा मोठे निर्णय घेऊ नये. संध्याकाळ आनंददायक आहे. कुटुंबासोबत वेळ घालवाल. ओम आदि गुरवे नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – तपकिरी

कुंभ

सकाळी चंद्राचे भ्रमण धनु राशीत असणार आहे, परंतु संध्याकाळी मकर राशीत प्रवेश करणार आहे. ओम आदि गुरवे नमः या मंत्राचा जप करणे.
आजचा रंग – आकाशी

मीन

सकाळी चंद्राचे भ्रमण धनु राशीत असणार आहे, परंतु संध्याकाळी मकर राशीत प्रवेश करणार आहे. भाग्यकारक दिवस, कामांचे उत्तम नियोजन करू शकाल. ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. दुर्गा कवचाचे पाठ करणे.
आजचा रंग – सोनेरी

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi friday 30 december