- मेष:-
मानसिक चंचलता जाणवेल. लहानांशी मैत्री कराल. जवळचा मित्र परिवार गोळा कराल. अभ्यासू लोकांच्यात वावराल. जुन्या कामातून धनलाभ संभवतो. - वृषभ:-
तुमच्यातील हरहुन्नरीपणा दिसून येईल. योग्य ठिकाणी कल्पकता दाखवावी. कमिशनमधून मिळणार्या लाभाकडे लक्ष राहील. व्यवसायाचे सखोल ज्ञान घ्यावे. व्यवहार चातुर्य ठेवावे लागेल. - मिथुन:-
गोड बोलण्याचा फायदा होईल. अंगीभूत कलेचे मूल्यमापन केले जाईल. लिखाणास प्रसिद्धी मिळेल. प्रवासाची आवड पूर्ण होईल. शिस्तप्रियता दाखवाल. - कर्क:-
कफ विकाराचा त्रास जाणवू शकतो. स्मरणशक्तीला ताण द्यावा. दिवसभर विचारात गर्क राहाल. तुमच्या अनुमानास निश्चिती येईल. इतरांना स्वेच्छेने मदत कराल. - सिंह:-
व्यावहारिक कुशलता दाखवावी लागेल. व्यापारात चांगला फायदा होईल. जोडीदाराशी गप्पा गोष्टी कराल. दुचाकी वाहन चालवताना सतर्कता बाळगावी. कामातून समाधान शोधाल. - कन्या:-
इतरांचा विश्वास संपादन करावा. जुन्या गोष्टी उकरून काढू नका. मनातील चुकीचे विचार बाजूस सारावेत. नसत्या भांडणात पडू नका. त्वचा विकार जाणवू शकतात. - तूळ:-
कलात्मक दृष्टीकोन ठेवाल. प्रत्येक गोष्टींत आनंद शोधाल. नवीन गोष्टी जाणून घेण्याची इच्छा दर्शवाल. जरूर नसतांना उदारपणे वागू नका. डोळ्यांचे त्रास संभवतात. - वृश्चिक:-
गोड बोलून कार्यभाग साधता येईल. जवळचे नातेवाईक भेटतील. मित्रा परिवाराबरोबर गप्पांत रमाल. उष्णतेचा त्रास संभवतो. महत्वाकांक्षा वाढीस लागेल. - धनू:-
काही गोष्टींचे चिंतन करावे. योग्य तर्क वापरावा लागेल. वक्तृत्वाची संधी चालून येईल. पारंपरिक कामातून लाभ संभवतो. बुद्धिमत्तेची चुणूक दाखवाल. - मकर:-
आर्थिक उन्नतीचा विचार कराल. व्यवहारी बुद्धिमत्तेने वागणे ठेवाल. हसत खेळत कामे कराल. काही कामे अकारण रेंगाळतील. घेतलेल्या ज्ञानाचा सदुपयोग कराल. - कुंभ:-
स्मरणशक्तीला चालना दिली जाईल. काही ठिकाणी धूर्तपणा वापरावा लागेल. सगळीकडे बारीक नजर ठेवाल. तत्परतेने कामे कराल. आवडीचे पदार्थ खायला मिळतील. - मीन:-
कर्जप्रकरणे तूर्तास दूर ठेवावीत. थोरांचा सल्ला घ्यावा. वरिष्ठांची मर्जी राखावी. व्यावसायिक ज्ञान गोळा कराल. दिवसभर चंचलता जाणवेल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
आजचे राशीभविष्य, शुक्रवार, ३१ जानेवारी २०२०
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन
First published on: 31-01-2020 at 00:31 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi friday 31 january 2020 aau