मेष
मेष राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. महत्त्वाच्या कामांसाठी, नवीन कामांसाठी, गाठीभेटीसाठी, बढतीचे प्रयत्न करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज एकट्याने निर्णय घेऊ नये. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायांत प्रगती कराल, अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. लक्ष्मी अष्टक पठण करणे.
आजचा रंग – लाल
वृषभ
मेष राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आर्थिक नियोजनसाठी चांगला दिवस आहे. नवीन योजना कार्यान्वित कराव्यात. वाहने जपून चालवावीत. कामांत उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – आकाशी
मिथुन
कालभैरव अष्टकाचा पाठ करावा. दुर्गाष्टमी, शाकंभरी देवी उत्सावारंभ आहे. मेष राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. सर्व कामांच्या पाठपुराव्यासाठी उत्तम दिवस आहे. वाहने जपून चालवावीत. कामांत उत्साह जाणवेल.
आजचा रंग – तपकिरी
कर्क
मेष राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. मोठे निर्णय घेऊ शकाल. अधिकारी वर्गाची, वरिष्ठांची मर्जी प्राप्त करू शकाल नवीन वाहनांचा योग, छोटे प्रवास घडू शकतात. नवीन संधी निर्माण होतील. त्याचा पाठपुरावा करावा, बढतीसाठी प्रयत्न करावेत.
आजचा रंग – पांढरा
सिंह
मेष राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. दुर्गाष्टमी, शाकंभरी देवी उत्सावारंभ. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घ्यावी. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. स्थावर मालमत्तेचे, व्यवसायाच्या जागेचे, राहत्या घराचे जागेचे प्रश्न मार्गी लागतील. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. कालभैरव दर्शन घ्यावे.
आजचा रंग – सोनेरी
कन्या
मेष राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घेणे, आर्थिक निर्णय सावधपणे घ्यावेत. वाहने जपून चालवावीत. कामांचा तणाव मनावर येऊ देऊ नका. आनंदी रहा. कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – पांढरा
तुळ
मेष राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. ताण कमी होईल. थोडी उसंत जाणवेल. वाहने जपून चालवावीत, कामांत उत्साह जाणवेल. कुटुंबाला वेळ देऊ शकाल. प्रवासाचे योग आहेत. देवी कवचाचे पाठ करावेत.
आजचा रंग – सोनेरी
वृश्चिक
मेष राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने आर्थिक सल्ला मसलत केल्याशिवाय घेऊ नयेत. महिलांनी प्रकृतीची काळजी घेणे, उष्णतेचे विकार होऊ देऊ नयेत. कुलस्वामिनीचे दर्शन घेणे.
आजचा रंग निळा
धनु
मेष राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. कामासाठी प्रवासाचे योग येतील. कदाचित परदेशी प्रवास करावे लागतील. नवीन संधीचा पाठपुरावा करावा, ताणतणाव कमी होतील. उलाढाली जपून कराव्यात. गुरुजनांमध्ये आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – पांढरा
मकर
मेष राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. अधिकारी वर्गाची मर्जी प्राप्त करू शकाल. नवीन जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. ती तुम्ही व्यवस्थित पार पाडाला. कामाचे कौतुक होईल. विद्यार्थ्यांना चांगला दिवस आहे. कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे. ओटी भरावी.
आजचा रंग – लाल
कुंभ
मेष राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. दुर्गाष्टमी, शाकंभरी देवी उत्सवारंभ. आर्थिक निर्णयासाठी उत्तम दिवस आहे. महत्त्वाच्या लोकांच्या गाठीभेटी होऊ शकतील. नवीन संधीचा पाठपुरावा करावा, ताणतणाव कमी होतील. दत्त महाराजांचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – आकाशी
मीन
मेष राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने, आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊ नये. उलाढाली जपून कराव्यात. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घेणे. मंदिरामध्ये जाऊन कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – राखाडी
– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu