- मेष:-
परोपकाराची जाणीव ठेवाल. धार्मिक कामात सहभाग घ्यावा. मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे. जोडीदाराशी मतभेद वाढवू नका. कामात वारंवार बदल करू नका. - वृषभ:-
व्यावहारिक कुशलता दाखवाल. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. वाद चिघळणार नाहीत याची काळजी घ्यावी. बौद्धीक ताण जाणवेल. हाताखालील लोकांवर लक्ष ठेवा. - मिथुन:-
लेखकांनी लेखणी जपून वापरावी. कामाचा उरक वाढेल. मुलांशी गप्पा मारल्या जातील. हसत-खेळत कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. खोटे बोलू नका. - कर्क:-
आपले मत आग्रहाने मांडाल. घरात नातेवाईक गोळा होतील. सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा. कर्तेपणाचा मान मिळवाल. जुन्या मित्रांच्या गाठीभेटी होतील. - सिंह:-
योग्य तर्क व अनुमान काढाल. सर्व गोष्टींचा चौकसपणे विचार कराल. कलात्मक दृष्टिकोन ठेवाल. भावंडांचे प्रश्न जाणून घ्यावेत. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. - कन्या:-
तुमच्या बोलण्याचा इतरांवर प्रभाव पडेल. शक्यतो जोड शब्द वापरले जातील याकडे लक्ष द्यावे. धीटपणे निर्णय घ्याल. कार्यक्षेत्रात वाढ होईल. दिवस आनंदात घालवाल. - तूळ:-
अत्यंत चालखपणे वागणे ठेवाल. तुमच्यातील हजरजबाबीपणा दिसून येईल. हटवादीपणे निर्णय घेतले जातील. कौटुंबिक खर्च वाढेल. घरातील कामात दिवस जाईल. - वृश्चिक:-
दिवस दगदगीत जाईल. अडथळ्यातून मार्ग काढावा. काही क्षुल्लक कारणाने कामे खिळून पडतील. पायाचे विकार जाणवतील. गोड पदार्थ खाण्याची हौस भागवाल. - धनु:-
घरात मंगल कार्य होईल. मित्रांशी सुसंवाद साधावा. व्यापारात चांगला आर्थिक लाभ संभवतो. नवीन विचारांची जोड घ्यावी. जवळचा प्रवास मजेत होईल. - मकर:-
यात्रेचे योग येतील. तुमच्यातील कल्पकता दाखवता येईल. कमिशनच्या कामातून फायदा काढाल. व्यावसायिक गोष्टींचा अंदाज बांधावा. छंद जोपासायला पुरेसा वेळ मिळेल. - कुंभ:-
मानसिक चंचलता जाणवेल. कामात स्त्रियांची मदत घ्याल. बढतीसाठी प्रयत्न करावेत. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. - मीन:-
चारचौघात तुमची कला सादर करता येईल. व्यवसायातील फायद्याचा पाठपुरावा करावा. मुलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. मानापमानाचे प्रसंग येऊ शकतात. जोडीदाराशी मतभेद टाळावेत.आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर कराAlready have a account? Sign in– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
First published on: 02-12-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi monday 02 december 2019 aau