- मेष:-
प्रेमसंबंध अधिक दृढ करावेत. मुलांची स्वतंत्रवृत्ती जाणून घ्यावी. उगाचच चिडचिड करू नये. मनाचा ठामपणा ठेवावा लागेल. क्षुल्लक गोष्टी फार मनावर घेवू नयेत. - वृषभ:-
चौकसपणे विचार कराल. जुगारातून फायदा संभवतो. स्वच्छंदीपणाने वागाल. घरात नातेवाईकांचा गोतावळा जमा होईल. स्वच्छतेवर अधिक लक्ष द्याल. - मिथुन:-
घरातील वातावरण आनंदी राहील. जोडीदाराकडून धनप्राप्ती होईल. लहान प्रवास होतील. कामे तडीस नेली जातील. काही कामे धावपळीत करावी लागतील. - कर्क:-
काही कौटुंबिक अडचणी दूर कराल. कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. अंगीभूत कलागुणांचा उपयोग होईल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. गुंतवणुकीला वाव आहे. - सिंह:-
जुन्या अनुभवातून शिकायला मिळेल. आपले उद्दिष्ट लक्षात ठेवावे. तुमच्याकडे लोक आदराने पाहतील. धावपळ वाढू शकते. वेळेचे भान राखावे लागेल. - कन्या:-
सरकारी कामानिमित्त प्रवास करावा लागेल. मनाची चंचलता जाणवेल. एकावेळी फार कामे हाती घेवू नका. कुटुंबासह प्रवास कराल. खर्च वाढू शकतो. - तूळ:-
मोठ्या लोकात उठबस होईल. केलेल्या कामाची योग्य दखल घेतली जाईल. अपेक्षेपेक्षा अधिक लाभ होईल. मित्रांची चांगली साथ लाभेल. चांगली आर्थिक प्राप्ती होईल. - वृश्चिक:-
केलेल्या नियोजनावर अधिक भर द्यावा. हातात नवीन अधिकार येतील. शत्रूंचा बंदोबस्त केला जाईल. आनंददायक घटना घडतील. विद्यार्थ्यांचे कौतुक केले जाईल. - धनु:-
धार्मिक कामासाठी प्रवास कराल. नवीन ठिकाणी धावपळ करावी लागेल. गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल. पाठदुखी सारखे त्रास जाणवतील. मुलांना अनुभवातून शिकायला मिळेल. - मकर:-
कामात एकाच ठिकाणी गुंतून पडाल. जोडीदाराशी मतभेद टाळावेत. काही कामात नकारघंटा वाजेल. चिकाटी सोडून चालणार नाही. आर्थिक लाभ संभवतात. - कुंभ:-
करता येण्याजोगी बरीच कामे सामोरी येतील. भागीदारीत विशेष लक्ष घालावे. बाहेरील कामात अधिक गुंतून पडाल. प्रवासात अधिक काळजी घ्यावी. योजनांवर लक्ष केंद्रित करावे. - मीन:-
कामातील अडचणी दूर होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आरोग्यात सुधारणा होईल. मोहात अडकू नका. वैवाहिक सौख्याकडे लक्ष द्यावे.आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर कराAlready have a account? Sign in– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
First published on: 02-09-2019 at 00:23 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi monday 02 september 2019 aau