- मेष:-
काहीशी चिडचिड वाढेल. लहान मुलांमध्ये रमून जाल. नवीन मित्र जोडले जातील. सरकारी कामात वेळ जाईल. कामाच्या ठिकाणी सतर्क राहावे. - वृषभ:-
मनातील इच्छा पूर्ण होईल. मानसिक चांचल्य जाणवेल. घरापासून दूर जावे लागेल. मनातील गैरसमज काढून टाकावेत. कामात स्त्रियांची मदत मिळेल. - मिथुन:-
अपचनाचा त्रास जाणवेल. कामात चालढकल करू नका. हितशत्रूंवर लक्ष ठेवावे. शारीरिक उष्णता वाढेल. जनविरोधाकडे दुर्लक्ष करावे. - कर्क:-
कामाची धांदल उडेल. प्रलोभनाला बळी पडू शकता. वैवाहिक सौख्याकडे लक्ष द्यावे. मुलांची चिंता लागून राहील. पैज जिंकण्याची इच्छा बाळगाल. - सिंह:-
वाहन वेगावर नियंत्रण ठेवा. घरातील समस्यांकडे अधिक लक्ष द्या. मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष असू द्या. नव्या संधीची वाट पहावी. जुने आजार दुर्लक्षित करू नका. - कन्या:-
वैवाहिक सौख्य द्विगुणित होईल. घरातील गोष्टी जाणून घ्याव्यात. भावंडांशी मतभेद संभवतात. स्वमतावर आग्रही राहाल. संघर्षाला बळी पडू नये. - तूळ:-
आर्थिक बाजूचा नीट विचार करावा. जरूरी नसतांना उदार होऊ नका. स्वभावात लहरीपणा राहील. वादविवाद घालू नका. डोळ्याचे त्रास जाणवू शकतात. - वृश्चिक:-
कामात हटवादीपणा येईल. महत्त्वाकांक्षा वाढेल. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. उद्दीष्ट साध्य करण्याचा प्रयत्न कराल. इतरांचाही विचार करावा. - धनू:-
जबाबदारीने वागाल. मनात कसलीशी काळजी लागून राहील. प्रवासात काळजी घ्यावी. घरातील काही गोष्टी बदलाव्या लागतील. कौटुंबिक प्रश्न सोडवावेत. - मकर:-
खर्चाचे गणित जमवावे लागेल. कामात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. वेळेचे योग्य नियोजन करावे लागेल. जुन्या गोष्टी काढत बसू नका. कामाचा ताण राहील. - कुंभ:-
बदललेल्या गोष्टी नीट समजून घ्याव्यात. कामात चंचलता राहील. मित्रांचा रोष वाढू शकतो. झोपेची तक्रार जाणवेल. कौटुंबिक समाधान असेल. - मीन:-
दिवस मनासारखा घालवाल. दोन पावलं मागे येण्यास घाबरू नका. स्थावरच्या कामातून लाभ संभवतो. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. कामात प्रगती कराल.या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन कराया बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन कराAlready have an account? Sign inसर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठीसबस्क्रिप्शनचे फायदेहजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आजचे राशीभविष्य, सोमवार, ०३ फेब्रुवारी २०२०
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन
First published on: 03-02-2020 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi monday 03 february 2020 aau