- मेष:-
घर टापटीप ठेवाल. घरासाठी नवीन वस्तू खरेदी कराल. क्षुल्लक गोष्टींवरून मनस्ताप करून घेवू नका. आत्मविश्वास बाळगावा. निराश होण्याचे कारण नाही. - वृषभ:-
आनंदी व स्वच्छंदी वृत्ती दर्शवाल. आरोग्यात सुधारणा होईल. धाडसाने कामे हाती घ्याल. कामात चलाखपणे वागाल. तुमच्या कामावर वरीष्ठ खुश असतील. - मिथुन:-
खर्चावर आवर घालावी लागेल. उत्तम गृहसौख्य लाभेल. सर्वांशी प्रेमळपणे वागाल. गायन कलेचे कौतूक केले जाईल. प्रतिष्ठा लाभेल. - कर्क:-
उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. चैन करण्याकडे कल राहील. मनाची संवेदनशीलता दर्शवाल. माहिती गोळा करण्यावर भर द्याल. मित्रांच्या रागाला बळी पडू नका. - सिंह:-
क्षणिक आनंद जपून ठेवावा. खर्चाला आवर घालावी. गृहपयोगी वस्तू खरेदी कराल. आवडीचे पदार्थ खाल. आरोग्याची काळजी घ्यावी. - कन्या:-
इतरांवर उत्कृष्ठ छाप पाडाल. भावनाशीलता दाखवाल. मनाची चंचलता जाणवेल. ओळखीचा चांगला फायदा होईल. कौटुंबीक सौख्य लाभेल. - तुळ:-
अधिकारी व्यक्ती घरी येतील. नव्या आकांक्षा मनात रुजतील. मनाची चंचलता दूर करण्याचा प्रयत्न करावा. फार विचार करू नये. ध्यानधारणा करावी. - वृश्चिक:-
आर्थिक कोंडी मिटेल. वडीलधाऱ्यांचा शब्द राखावा. स्वतःचा मान जपावा. मैत्रीचे संबंध दृढ होतील. प्रयत्न करणे सोडू नये. - धनु:-
कामात द्विधावस्था आड येणार नाही याची काळजी घ्या. दृढनिश्चयांवर भर द्यावा लागेल. चटकन कोणावरही विश्वास ठेवू नका. किरकोळ दुखण्याकडे लक्ष द्यावे. हातातील कामाला गती येईल. - मकर:-
शैक्षणीक कामे पार पडतील. परोपकाराची जाणीव ठेवाल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. सेवावृत्ती दाखवाल. नावलौकिक वाढेल. - कुंभ:-
अपचनाचा त्रास जाणवू शकतो. फार विचार करू नये. मानसिक चांचल्य जाणवेल. उधार-उसनवारीचे व्यवहार होतील. कामाला गती येईल. - मीन:-
भागीदारीत समाधानी असाल. कौटुंबिक सौख्य लाभेल. जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवाल. मैदानी खेळ खेळाल. व्यावहारिक ज्ञान वापराल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
आजचे राशीभविष्य, सोमवार, ०५ ऑगस्ट २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
First published on: 05-08-2019 at 00:28 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi monday 05 august 2019 aau