• मेष:-
    घर टापटीप ठेवाल. घरासाठी नवीन वस्तू खरेदी कराल. क्षुल्लक गोष्टींवरून मनस्ताप करून घेवू नका. आत्मविश्वास बाळगावा. निराश होण्याचे कारण नाही.
  • वृषभ:-
    आनंदी व स्वच्छंदी वृत्ती दर्शवाल. आरोग्यात सुधारणा होईल. धाडसाने कामे हाती घ्याल. कामात चलाखपणे वागाल. तुमच्या कामावर वरीष्ठ खुश असतील.
  • मिथुन:-
    खर्चावर आवर घालावी लागेल. उत्तम गृहसौख्य लाभेल. सर्वांशी प्रेमळपणे वागाल. गायन कलेचे कौतूक केले जाईल. प्रतिष्ठा लाभेल.
  • कर्क:-
    उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. चैन करण्याकडे कल राहील. मनाची संवेदनशीलता दर्शवाल. माहिती गोळा करण्यावर भर द्याल. मित्रांच्या रागाला बळी पडू नका.
  • सिंह:-
    क्षणिक आनंद जपून ठेवावा. खर्चाला आवर घालावी. गृहपयोगी वस्तू खरेदी कराल. आवडीचे पदार्थ खाल. आरोग्याची काळजी घ्यावी.
  • कन्या:-
    इतरांवर उत्कृष्ठ छाप पाडाल. भावनाशीलता दाखवाल. मनाची चंचलता जाणवेल. ओळखीचा चांगला फायदा होईल. कौटुंबीक सौख्य लाभेल.
  • तुळ:-
    अधिकारी व्यक्ती घरी येतील. नव्या आकांक्षा मनात रुजतील. मनाची चंचलता दूर करण्याचा प्रयत्न करावा. फार विचार करू नये. ध्यानधारणा करावी.
  • वृश्चिक:-
    आर्थिक कोंडी मिटेल. वडीलधाऱ्यांचा शब्द राखावा. स्वतःचा मान जपावा. मैत्रीचे संबंध दृढ होतील. प्रयत्न करणे सोडू नये.
  • धनु:-
    कामात द्विधावस्था आड येणार नाही याची काळजी घ्या. दृढनिश्चयांवर भर द्यावा लागेल. चटकन कोणावरही विश्वास ठेवू नका. किरकोळ दुखण्याकडे लक्ष द्यावे. हातातील कामाला गती येईल.
  • मकर:-
    शैक्षणीक कामे पार पडतील. परोपकाराची जाणीव ठेवाल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. सेवावृत्ती दाखवाल. नावलौकिक वाढेल.
  • कुंभ:-
    अपचनाचा त्रास जाणवू शकतो. फार विचार करू नये. मानसिक चांचल्य जाणवेल. उधार-उसनवारीचे व्यवहार होतील. कामाला गती येईल.
  • मीन:-
    भागीदारीत समाधानी असाल. कौटुंबिक सौख्य लाभेल. जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवाल. मैदानी खेळ खेळाल. व्यावहारिक ज्ञान वापराल.
    या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
    Skip
    या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर