- मेष:-
भावंडांचे प्रश्न समजून घ्यावेत. काही गोष्टी अचानक सामोऱ्या येतील. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. खर्चावर आवर घालावी. वादाचे मुद्दे सामोपचाराने सोडवावेत. - वृषभ:-
जोडीदाराच्या प्रक्रृतीची काळजी घ्यावी. एकमेकांत मतभिन्नता राहील. जोडीदाराचा वरचष्मा राहील. संमय वाढवावा लागेल. महत्वकांक्षेत वाढ होईल. - मिथुन:-
खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. पोटाच्या तक्रारी जाणवतील. भांडकुदळ व्यक्तींपासून दूर राहावे. तिखट व तामसी पदार्थ खाण्याची आवड पूर्ण कराल. उष्णतेचे त्रास वाढू शकतात. - कर्क:-
मुलांशी जुळवून घ्यावे लागेल. कामातील विलंब टाळावा. पैज जिंकता येईल. मुलांच्या धडपडीकडे लक्ष द्यावे. जुगाराची आवड पूर्ण कराल. - सिंह:-
संघर्षापासून दूर राहावे. घरातील शांतता जपावी. दुचाकी वाहन चालवितांना काळजी घ्यावी. कौटुंबिक सौख्याकडे लक्ष द्यावे. दिवसभर कामात व्यग्र राहाल. - कन्या:-
न डगमगता कामे कराल. भावंडांची बाजू समजून घ्यावी लागेल. परिस्थिती समजून घेऊन वागावे. स्वमतावर आग्रही राहाल. हातापायाच्या दुखण्यांकडे लक्ष द्यावे. - तूळ:-
स्वभावात लहरीपणा येईल. जरुरी नसतांना उदारपणे वागू नका. वस्तूची उपयुक्तता लक्षात घेऊन खरेदी करावी. बोलतांना भान राखावे. उतावीळपणा करून चालणार नाही. - वृश्चिक:-
रागाच्या भरात निर्णय घेतले जातील. संमय व धैर्य ठेवावे. कामात मेहनत घ्याल. वाहन चालवितांना काळजी घ्यावी. हातातील कामात यश येईल. - धनु:-
स्वतः चे स्वत्व राखण्याचा प्रयत्न कराल. वागण्यातून आत्मविश्वास दाखवाल. सामाजिक कार्यात हातभार लावाल. योग्य तर्क वापरावा. न्यायी वृत्तीने वागणे ठेवाल. - मकर:-
सतत खटपट करत राहाल. प्रलोभनांपासून दूर राहावे. सामाजिक सेवेत हातभार लावाल. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. महत्वाची कागदपत्रे जपून ठेवावी. - कुंभ:-
जिवाभावाचे मित्र भेटतील. आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. काटकसरीने वागाल. व्यवहारी दृष्टिकोन ठेवाल. वाहन विषयक कामे होतील. - मीन:-
व्यावसायिक चिंता मिटेल. हातातील अधिकारात वाढ होईल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. कौटुंबिक वातावरण चांगले असेल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
आजचे राशीभविष्य, सोमवार, ०६ जानेवारी २०२०
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन
First published on: 06-01-2020 at 06:09 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi monday 06 january 2020 aau