मेष

कालभैरव आणि महादेव मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. मोठे व्यावसायिक धाडस करू शकाल. सर्व क्षेत्रातील अधिकारी वर्गासाठी अनुकूल ग्रहमान आहेत. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. आर्थिक नियोजन उत्तम राहील. व्यावसायिकांचे नियोजन उत्तम राहील.
आजचा रंग –पांढरा

Rishi Panchami Vrat importance
Rishi Panchami 2024: ‘ही’ एक गोष्ट न केल्यास ऋषीपंचमीचे व्रत मानले जाते अपूर्ण; जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
28th August Panchang & Marathi Rashi Bhavishya
२८ ऑगस्ट पंचांग: मृगाशिरा नक्षत्रात मेष, कन्यासह ‘या’ राशींची होणार भरभराट; आनंदवार्ता मिळणार तर प्रियजनांची भेट होणार; वाचा तुमचं राशीभविष्य
These four zodic sign dear of Shri Krishna
आकस्मिक धनलाभ होणार; श्रीकृष्णाच्या ‘या’ चार प्रिय राशींना मिळणार धन-संपत्ती आणि ऐश्वर्याचे सुख
Krishna Janmashtami 2024 horoscope
आता नुसता पैसा; कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी गुरू, चंद्र, शनी चमकवणार ‘या’ तीन राशींचे भाग्य
25th August Panchang & Marathi Rashi Bhavishya
२५ ऑगस्ट पंचांग: शुक्राचा कन्या राशीत प्रवेश ‘या’ राशींसाठी ठरेल वरदान; उत्पन्नात होईल वाढ तर नशिबाची मिळेल साथ; वाचा सुट्टी विशेष राशीभविष्य
23rd August Panchang & Marathi Rashi Bhavishya
२३ ऑगस्ट पंचांग: लक्ष्मीच्या कृपेने होईल धन-संपत्तीचा वर्षाव; अमृत सिद्धी योग बदलणार ‘या’ राशींचं नशीब; वाचा तुमचं शुक्रवारचं भविष्य
Sukraditya Raja Yoga The grace of Goddess Lakshmi
शुक्रादित्य राजयोगाचा प्रभाव; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींवर असणार देवी लक्ष्मीची कृपा

वृषभ

ॐ नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. परदेशाशी निगडीत व्यापार, व्यवसाय करणाऱ्यांसाठी उत्तम ग्रहमान आहेत. व्यावसायिकांना लाभदायक ग्रहमान आहेत. प्रतिष्ठेचे योग संभवतात. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल, महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. संततीशी निगडीत अडीअडचणी सोडवू शकाल.
आजचा रंग –फिक्कट पिवळा

मिथुन

ॐ नमः शिवाय या मंत्राचा जप करावा, महादेवाची उपासना करावी. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. व्यावसायिक उलाढाल जपून करावी. महत्त्वाचे निर्णय घेत असताना विचारविनिमय करावा. प्रवास जपून करावेत. सर्वांशी सलोखा राखावा. मोठी आर्थिक उलाढाल करू नये.
आजचा रंग –नारंगी

कर्क

ॐ शांभवे नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. व्यावसायिकांना प्रगतीकारक ग्रहमान आहेत. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. कौटुंबिक स्थिरतेच्या दृष्टीने अनुकूल ग्रहमान आहे. शेती, कमोडिटी, शेअर्स, लोखंड आणि रासायनिक उद्योगांना प्रगतीकारक ग्रहमान आहेत. गुंतवणुकीस अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग –निळा

सिंह

गणपती आणि महादेव मंदिरामध्ये फुले अर्पण करून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी. उष्णतेचे आणि वाताशी निगडीत आजार संभवतात. व्यवसायामध्ये सावधपणे निर्णय घ्यावेत. मोठया आर्थिक गुंतवणुकीचे निर्णय घेत असताना सावधानता बाळगावी. वादविवाद टाळावेत. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग -मोरपंखी

कन्या

महादेवाचे दर्शन घेऊन दक्षिणा अर्पण करून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेवू शकाल. नवीन योजना राबविण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभेल. कुटूंबाचे आणि संततीचे प्रश्न सोडवू शकाल. व्यवसायामध्ये धाडसी निर्णय घेऊ शकाल. कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये उत्तम ग्रहमान आहेत.
आजचा रंग –जांभळा

तुळ

कुलदैवत आणि कुमस्वामिनीचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवू शकाल. घरातील ज्येष्ठ मंडळींच्या प्रकृतीची काळजी सतावेल. राहत्या घराचे प्रश्न सोडवू शकाल. बांधकाम व्यावसायिक, फर्निचर, गृह उपयोगी वस्तु आणि लोखंडाशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी उत्तम ग्रहमान आहेत. कुटूंबासमवेत वेळ घालवू शकाल.
आजचा रंग -मोरपंखी

वृश्चिक

ॐ नमः शिवाय या मंत्राचा जप करून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. भावंडांच्या गाठीभेटीचे योग आहेत. सर्व क्षेत्रामध्ये स्पर्धा जाणवेल परंतु स्पर्धेमध्ये टिकून राहू शकाल. कामामध्ये ताणतणाव जाणवेल. नोकरदारांना, गृहिणींना अतिरिक्त कामाचा आणि जबाबदारीचा योग आहे. आर्थिक नियोजन उत्तम राहील.
आजचा रंग –गुलाबी

धनु

सद्‌गुरूंचे स्मरण करावे, गुरू मंत्राचा जप करून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. नवीन योजना राबवू शकाल. व्यावसायिक हितसंबंध दृढ करू शकाल. जुनी येणी वसूल करू शकाल. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यावसायिकांना उत्तम आर्थिक स्थितीचा दिवस आहे.
आजचा रंग –हिरवा

मकर

घरांतील देवाला दही, भातांचा नेवैद्य दाखवावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. आर्थिक आवक उत्तम राहील. व्यावसायिक नियोजन आर्थिक उन्नती करणारे ठरेल.
आजचा रंग –पोपटी

कुंभ

घरांतील देवाला दही, भातांचा नेवैद्य दाखवावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. मोठी आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी. कुठल्याही स्वरूपाचे वादविवाद टाळावेत. कौटुंबिक सौख्य लाभेल. बांधकाम व्यावसायिक, जमिनीचे खरेदीविक्री करणारे व्यावसायिक यांनी विशेष दक्षता बाळगावी. कायदेशीर प्रश्न सोडवू शकाल.
आजचा रंग-पोपटी

मीन

ॐ ऱ्हीं क्लीं शिवाय नमः या बीज मंत्राचे उच्चारण करून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहेत. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. स्थावर मालमत्तेशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. कोर्ट, कचेरी, वादविवाद यातून सामोपचाराने मार्ग काढू शकाल.
आजचा रंग –राखाडी

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu