- मेष:-
कामात स्थैर जपण्याचा प्रयत्न करावा. कौतुकास पात्र व्हाल. व्यापाऱ्यांना चांगला फायदा संभवतो. मनाची चंचलता वाढू देऊ नका. घराची साफसफाई काढाल. - वृषभ:-
शैक्षणिक कामे होतील. धार्मिक स्थळांना भेट द्याल. सेवेचे महत्व समजावून सांगाल. घरात मंगलकार्ये होतील. स्वप्नात रमून जाल. - मिथुन:-
अचानक धनलाभाची शक्यता. जुनी कामे सामोरी येतील. नसत्या चिंता करू नका. एकावेळी अनेक कामे काढू नका. घरगुती कामात गढून जाल. - कर्क:-
जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. भागीदारीतून चांगला फायदा होईल. तुमचा जनसंपर्क वाढेल. जवळचे नातेवाईक भेटतील. करमणुकीचे कार्यक्रम बघाल. - सिंह:-
परिस्थितीला नावे ठेवू नका. क्षुल्लक गोष्टी दुर्लक्षित कराव्यात. आत्मविश्वास बाळगावा. चटकन निराश होऊ नये. कफविकार जाणवतील. - कन्या:-
चौकसपणे विचार करावेत. सदैव जागरूकता दाखवाल. मुलांच्यात खेळण्यात रमून जाल. जुगारातून फायदा होईल. कामामुळे थकवा जाणवेल. - तूळ:-
घरातील वातावरण आनंदी राहील. गृहिणी सर्वांचे मनापासून करतील. कामातील आधुनिकता जाणून घ्याल. उत्तम गृहसौख्य लाभेल. सर्वांशी प्रेमळपणे वागाल. - वृश्चिक:-
भावंडांची मदत मिळेल. विविध विषयात रुची दाखवाल. जवळचा प्रवास मजेत होईल. मानसिक चाचंल्य जाणवेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. - धनु:-
गृहउपयोगी वस्तू खरेदी कराल. दिवस धावपळीत जाईल. आवडीचे पदार्थ चाखाल. कौटुंबिक सौख्याचा दिवस. चिकाटीने कामे कराल. - मकर:-
तुमच्या शब्दाला मान मिळेल. सर्वांवर तुमची उत्तम छाप पडेल. दिवसभर प्रसन्न वाटेल. कमिशनचा फायदा उठवावा. कलेत मन रमवाल. - कुंभ:-
फार विचार करत बसू नका. थोडे अधिक कष्ट पडू शकतात. ध्यानधारणा करावी. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी. मानसिक शांतता जपावी. - मीन:-
स्त्री समुहात वावराल. चांगला व्यावसायिक फायदा संभवतो. कामात स्त्रीवर्गाची मदत होईल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. सुखासक्तपणे वागाल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
आजचे राशीभविष्य, सोमवार, ०७ ऑक्टोबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 07-10-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi monday 07 october 2019 aau