- मेष:-
कामात स्थैर जपण्याचा प्रयत्न करावा. कौतुकास पात्र व्हाल. व्यापाऱ्यांना चांगला फायदा संभवतो. मनाची चंचलता वाढू देऊ नका. घराची साफसफाई काढाल. - वृषभ:-
शैक्षणिक कामे होतील. धार्मिक स्थळांना भेट द्याल. सेवेचे महत्व समजावून सांगाल. घरात मंगलकार्ये होतील. स्वप्नात रमून जाल. - मिथुन:-
अचानक धनलाभाची शक्यता. जुनी कामे सामोरी येतील. नसत्या चिंता करू नका. एकावेळी अनेक कामे काढू नका. घरगुती कामात गढून जाल. - कर्क:-
जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. भागीदारीतून चांगला फायदा होईल. तुमचा जनसंपर्क वाढेल. जवळचे नातेवाईक भेटतील. करमणुकीचे कार्यक्रम बघाल. - सिंह:-
परिस्थितीला नावे ठेवू नका. क्षुल्लक गोष्टी दुर्लक्षित कराव्यात. आत्मविश्वास बाळगावा. चटकन निराश होऊ नये. कफविकार जाणवतील. - कन्या:-
चौकसपणे विचार करावेत. सदैव जागरूकता दाखवाल. मुलांच्यात खेळण्यात रमून जाल. जुगारातून फायदा होईल. कामामुळे थकवा जाणवेल. - तूळ:-
घरातील वातावरण आनंदी राहील. गृहिणी सर्वांचे मनापासून करतील. कामातील आधुनिकता जाणून घ्याल. उत्तम गृहसौख्य लाभेल. सर्वांशी प्रेमळपणे वागाल. - वृश्चिक:-
भावंडांची मदत मिळेल. विविध विषयात रुची दाखवाल. जवळचा प्रवास मजेत होईल. मानसिक चाचंल्य जाणवेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. - धनु:-
गृहउपयोगी वस्तू खरेदी कराल. दिवस धावपळीत जाईल. आवडीचे पदार्थ चाखाल. कौटुंबिक सौख्याचा दिवस. चिकाटीने कामे कराल. - मकर:-
तुमच्या शब्दाला मान मिळेल. सर्वांवर तुमची उत्तम छाप पडेल. दिवसभर प्रसन्न वाटेल. कमिशनचा फायदा उठवावा. कलेत मन रमवाल. - कुंभ:-
फार विचार करत बसू नका. थोडे अधिक कष्ट पडू शकतात. ध्यानधारणा करावी. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी. मानसिक शांतता जपावी. - मीन:-
स्त्री समुहात वावराल. चांगला व्यावसायिक फायदा संभवतो. कामात स्त्रीवर्गाची मदत होईल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. सुखासक्तपणे वागाल.आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर कराAlready have a account? Sign in– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
First published on: 07-10-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi monday 07 october 2019 aau