• मेष:-
    जोडीदाराशी मनमोकळ्या गप्पा माराल. तुमच्यातील सुशिक्षितपणा दिसून येईल. बुद्धिवादी दृष्टिकोन मांडाल. व्यापारात नवीन योजना आखाल. बोलण्यातून मैत्ती वाढीस लागेल.
  • वृषभ:-
    इतरांचा विश्वास संपादन करावा. भांडणात अडकू नका. वाताचे त्रास जाणवू शकतात. गोड बोलून कामे करून घ्याल. जुन्या गोष्टी काढू नका.
  • मिथुन:-
    गप्पांचा फड जमेल. गायन कलेला वाव मिळेल. कामातील दिरंगाई टाळावी. प्रकृतीची काळजी घ्यावी. अडचणींवर मात कराल.
  • कर्क:-
    घराची साफसफाई कराल. बागकामात मन रमेल. जवळचे मित्र जमवाल. बोलण्यातून सर्वांना चकित कराल. ज्येष्ठांचे मार्गदर्शन मिळेल.
  • सिंह:-
    कामात चौकसपणा दाखवावा. काही गोष्टींचे परिक्षण करावे. चालाखी दाखवण्याची संधी मिळेल. प्रकाशकांना फायदा संभवतो. लहान प्रवास मजेत होईल.
  • कन्या:-
    व्यावहारीक बुध्दी वापराल. हसत हसत कामे उरकून घ्याल. गायकांना चांगली संधी मिळेल. गोड बोलून कामे कराल. साम्पत्तिक दर्जा सुधाराल.
  • तूळ:-
    आपले विचार उत्तम रितीने मांडाल. हजरजबाबीपणे उत्तर द्याल. वाणीत गोडवा ठेऊन बोलाल. कामात तत्परता दाखवाल. सर्व गोष्टी जाणून घ्याल.
  • वृश्र्चिक:-
    उघडपणे बोलणे टाळावे. सामाजिक बांधिलकी म्हणून काम करावे. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नये. एकमेकांमधील ओढ अधिक वाढेल. झोपेची तक्रार मिटेल.
  • धनू:-
    तरूणांशी मैत्री वाढवाल. लहान मुलांमध्ये खेळण्यात रमून जाल. स्त्री वर्गाशी गप्पा गोष्टी कराल. चांगला आर्थिक नफा होईल. भागिदारीत समाधानी असाल.
  • मकर:-
    व्यापारी वर्गाला चांगला फायदा होईल. मध्यस्थिचा लाभ मिळेल. लेखनाला अधिक उठाव मिळेल. हरहुन्नरीपणे वागाल. पुढील गोष्टींचा अंदाज घ्यावा.
  • कुंभ:-
    उत्तम वक्तृत्व गुण दाखवाल. वाचनाची आवड जोपासली जाईल. प्रवास मजेत होईल. बौध्दिक छंद पुर्ण कराल. लिखाणाला प्रसिध्दी मिळेल.
  • मीन:-
    कफ विकार जाणवतील. अतिविचार करु नयेत. स्मरणशक्तीचा​ योग्य ठिकाणी वापर करता येईल. भावंडांना मदत कराल. अचानक धनलाभाची शक्यता.
    या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
    Skip
    या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर