• मेष:-
    फक्त आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्यावा. गैरसमजापासून दूर राहावे. तुमच्यावर जोडीदाराचा पगडा राहील. प्रवासाचा योग येईल. स्पर्धेत विजयी व्हाल.
  • वृषभ:-
    छुप्या शत्रूंचा त्रास होऊ शकतो. तब्बेतीची वेळेवर काळजी घ्यावी. लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. हाताखालील लोकांकडे लक्ष ठेवावे. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत.
  • मिथुन:-
    मुलांची प्रगती दिसून येईल. गोष्टी मानाजोग्या घडून येतील. लॉटरी, जुगार यातून कमाई करता येईल. कारमणुकीवर पैसे खर्च कराल. कामात स्त्रियांची मदत मिळेल.
  • कर्क:-
    गृहसौख्याकडे लक्ष द्यावे. घरगुती वस्तू खरेदी कराल. कामाची धावपळ राहील. मनाची एकाग्रता साधावी लागेल. कसलीही घाई उपयोगाची नाही.
  • सिंह:-
    जवळचा प्रवास होईल. लेखणीची धार दिसून येईल. वाचनात मन रमून जाईल. महात्त्वाकांक्षा वाढीस लागेल. किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष करू नका.
  • कन्या:-
    कौटुंबिक खर्च वाढेल. पैशाच्या बाबतीत सारासार विचार करून खर्च करावा. अचानक धनलाभ संभवतो. अतिविचार करणे टाळावे. तिखट व तामसी पदार्थ चाखाल.
  • तूळ:-
    दृढनिश्चय करावा लागेल. भांडणातून गैरसमज वाढू शकतात. तुमच्या काही विचारांना विरोध होऊ शकतो. स्नायू धरणे यांसारखे त्रास जाणवू शकतात. कामाच्या ठिकाणी शांत रहावे.
  • वृश्चिक:-
    नसत्या चिंतानी ग्रासून जाऊ नका. झोपेचा त्रास जाणवू शकतो. पायाची दुखणी बळावू शकतात. चहाडखोर व्यक्तींपासून दूर राहावे. सामाजिक जाणिव ठेवून वागावे.
  • धनु:-
    मुलांकडून आनंद वार्ता मिळतील. नवीन मित्र जोडाल. कष्टाला घाबरून जाऊ नका. पुरेशी झोप घ्यावी. फसवणुकीपासून सावध राहावे.
  • मकर:-
    व्यावसायिक उत्कर्ष साधण्याचा प्रयत्न कराल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. आत्मविश्वासाच्या बळावर काम कराल. तुमचा योग्य तो आदर राखला जाईल. धार्मिक स्थळांना भेट द्याल.
  • कुंभ:-
    भावंडांची मदत होईल. लिखाणाला चांगली प्रसिद्धी मिळेल. प्रवासात काळजी घ्यावी. वेगावर नियंत्रण ठेवावे. कमिशन मधून फायदा मिळेल.
  • मीन:-
    आवडीचे पदार्थ खाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. जवळचे नातेवाईक भेटतील. गैरसमजाला बळी पडू नका. अंगची कला जोपासावी.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader