मेष

ॐ प्रबुध्दाय नमः. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. ग्रहांच्या अनुकुलतेमध्ये व्यावसायिक स्थिरता प्राप्त होईल. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. सर्वांशी सुसंवाद राहील. वेळेचा योग्य वापर करावा. नियोजनबध्द दिवसाची आखणी करावी.
आजचा रंग –नारंगी

वृषभ

ॐ स्वस्वरुपाय नमः. मोठे निर्णय सावधपणे घ्यावे. कुठल्याही कामात दिरंगाई नको. प्रवास जपून करावेत. आर्थिक व्यवहारामध्ये दक्षता बाळगावी.
आजचा रंग – आकाशी

मिथुन

ॐ जगदपालकाय नमः. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. व्यवसायात अनुकुल वातावरण आहे. आर्थिक स्थिरता प्राप्त होईल. व्यावसायिक नियोजन उत्तम राहील. कमोडिटी, मार्केट, शेअर्समध्ये अनुकुल ग्रहमान राहील.
आजचा रंग –पांढरा

कर्क

ॐ शांभवे नमः. अधिकार संपन्नता येईल. उत्तम आर्थिक नियोजन करु शकाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. बांधकाम व्यावसायिक, स्थावर मालमत्तेशी निगडीत व्यावसायिकांना अनुकुल ग्रहमान आहे.
आजचा रंग –गडद पिवळा

सिंह

ॐ ईश्वराय नमः. प्रगतीकारक ग्रहमान आहे. व्यवसाय, नोकरीमध्ये प्रतिष्ठा प्राप्त होईल. अनेक नवीन योजना राबविता येतील. वादविवाद टाळावेत. प्रवास जपून करावेत.
आजचा रंग -नारंगी

कन्या

ॐ प्रजापतये नमः. मोठे व्यावसायिक धाडस नको. प्रकृतीची काळजी घ्यावी. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. कमोडिटी, शेअर्स, मार्केट, व्यावसायिकांनी सावधपणे गुंतवणूक करावी. वादविवाद टाळावे.
आजचा रंग –नेव्ही ब्ल्यू

तुळ

ॐ भार्गवाय नमः. व्यवसायात अनुकुल ग्रहमान राहील. अडचणींवर मात करु शकाल. नवीन संधी उपलब्ध होतील. पती पत्नी मधील दुरावा कमी होईल. कौटुंबीक सौख्य लाभेल.
आजचा रंग -नारंगी

वृश्चिक

ॐ वरदायिने नमः. आर्थिक नियोजन सावधपणे करावे. कुठल्याही स्वरुपाचे वादविवाद टाळावे. सहकार्‍यांशी, कामगारांशी सुसंवाद राखावा. मोठे आर्थिक नियोजन करताना सावधानता बाळगावी.
आजचा रंग –पोपटी

धनु

ॐ सोमाय नमः. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. धाडसी निर्णय घेऊ शकाल. नवीन योजनांचा पाठपुरावा करावा. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. उत्तम आर्थिक स्थितीचे योग आहे.
आजचा रंग –नारंगी

मकर

ॐ चिदंबराय नमः. कौटुंबीक समस्या सोडवू शकाल. नातेवाईकांशी, आप्तेष्ठांशी भेटीचे योग आहे. बांधकाम व्यावसायिकांना अनुकुल ग्रहमान आहे. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रवास जपून करावा.
आजचा रंग –आकाशी

कुंभ

ॐ खगाय नमः. वादविवाद टाळावेत. व्यावसायीक स्पर्धेचे योग आहे. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक नियोजन योग्य करु शकाल. भावंडांशी वादविवाद टाळावेत.
आजचा रंग-राखाडी

मीन

ॐ दामोदराय नमः. आर्थिक नियोजन उत्तम करु शकाल. व्यावसायिक आणि नोकरदार मंडळींना उत्तम ग्रहमान आहे. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. उत्तम आर्थिक स्थितीचा योग आहे.
आजचा रंग – तपकिरी

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

Story img Loader