• मेष:-
    पारमार्थिक उन्नतीला प्राधान्य द्याल. कर्मठपणे मत मांडाल. वडिलधाऱ्यांचा योग्य तो मान ठेवावा. सेवावृत्तीने कामे कराल. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल.
  • वृषभ:-
    आरोग्याबाबत हयगय करू नये. प्रतिकुलतेतून मार्ग काढाल. विरोधकांवर लक्ष ठेवावे. काही गोष्टींमध्ये संयम बाळगावा लागेल. मानसिक स्थैर्य जपावे.
  • मिथुन:-
    वाणीतील गोडवा जपावा. आवडीचे पदार्थ चाखायला मिळतील. जोडीदाराच्या संयमाचे कौतूक कराल. शांतपणे विचार करावा. वैचारिक प्रौढता दाखवाल.
  • कर्क:-
    वैवाहिक सौख्यात भर पडेल. उदार मतवादी असाल. आळस दूर सारावा. कामाचे समाधान मिळेल. कणखरपणे आपले विचार मांडावेत.
  • सिंह:-
    व्यावहारीक दृष्टीकोन ठेवाल. मुलांशी वादाचे प्रसंग टाळावेत. ज्ञानाचा योग्य वापर करण्याची संधी मिळेल. मानसिक व्यग्रता टाळावी. सखोल ज्ञानावर भर द्याल.
  • कन्या:-
    स्त्री सहवासात रमाल. सामाजिक दर्जा सुधारण्यास मदत होईल. सतत प्रयत्नशील रहाल. शांत, निवांत वातावरणात रमाल. चांगले गृहसौख्य लाभेल.
  • तुळ:-
    मानाने पैसा कामवाल. पराक्रमाला चांगला वाव मिळेल. सामाजिक गोष्टीत पुढाकार घ्याल. मुलांच्याबाबत दक्षता बाळगावी. प्रवास चांगला होईल.
  • वृश्चिक:-
    स्वत:चे स्थान टिकवण्याचा प्रयत्न कराल. स्थावरची कामे निघतील. काटकसरीने वागाल. कौटुंबिक जबाबदारीची जाणीव ठेवून वागाल. जुन्या कामात वेळ जाईल.
  • धनु:-
    कामातील अडथळे दूर सारावेत. आपला दर्जा सुधारण्याचा प्रयत्न कराल. चिकाटीने कामे हाती घ्याल. निराशा दूर सारावी. तुमची वागणूक आदर्श असेल.
  • मकर:-
    राहणीमान उंचावण्याचा प्रयत्न कराल. जोडीदाराच्या निश्चयावर खुश असाल. वैवाहिक सौख्यात भर पडेल. सहकुटुंब प्रवासाचे बेत आखाल. खर्चावर नियंत्रण ठेवावे.
  • कुंभ:-
    कामाचा उरक चांगला असेल. आरोग्यात सुधारणा होईल. कार्यपद्धतीत सुधारणा कराल. व्यावसायीक लाभावर लक्ष ठेवा. जुने मित्र भेटतील.
  • मीन:-
    बौद्धिक गोष्टीत लक्ष घालाल. आवडती वस्त्रे खरेदी कराल. चोखंदळपणा दर्शवाल. मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर लक्ष ठेवा. स्वत:च्या मतावर आग्रही राहाल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर