मेष

आज राशीच्या लाभस्थानावर चंद्र आहे. हा चंद्र आर्थिक स्थैर्यासाठी उत्तम आहे. स्त्रियांच्या दृष्टीने मानसिक स्वास्थ्याचा दिवस. आजचा दिवस विद्यार्थिनींसाठी प्रगतीचा ठरेल. महादेवाच्या मंदिरामध्ये फुले अर्पण करावी.

वृषभ

आज सकाळी नऊ वाजल्यापासून आपल्या राशीमध्ये चंद्र भ्रमण करणार आहे. हे भ्रमण उत्तम यश प्राप्त करून देणारे आहे. पुढील कामाच्या नियोजनासाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. स्त्रियांसाठी आजचा दिवस उत्साहाचा ठरेल. आज सकाळी आणि संध्याकाळी घरामध्ये धूप लावून सहस्त्र नामाचा पाठ करावा.
आजचा रंग – पांढरा

मिथुन

आठवड्याच्या पहिल्या दिवशी चंद्र व्ययात आहे. त्यामुळे सावध पवित्रा ठेवून दिवसाची सुरुवात करावी. ओम सांभवेय नमः मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – पांढरा

कर्क

आठवड्याची सुरुवात करत असताना संपूर्ण आठवड्याचे नियोजन करावे. स्त्रियांनी व्यक्तिगत जीवनाची चर्चा करू नये. नोकरीमध्ये उतावळेपणा करू नये. ओम नमः शिवाय मंत्राचा जप सुरू ठेवावा.
आजचा रंग – पांढरा

सिंह

आजचा दिवस उत्साही आहे. पुढील नोकरी, व्यवसायाचे कामाचे नियोजन करण्यासाठी आजचा दिवस विशेष महत्त्वाचा आहे. ओम महालक्ष्मैय नमः मंत्राचा जप दिवसभर करावा.
आजचा रंग – हिरवा

कन्या

आज आठवड्याची सुरुवात चांगल्या कामानी होईल. उत्साहवर्धक वातावरण राहिल. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – नारंगी

तुळ

आठवड्याची सुरुवात सावधपूर्वक करावी. कोणलाही जास्तीचा शब्द देऊ नये. आवाक्याच्या कामांनाच होकार द्यावा. महादेवाचे दर्शन घ्यावे. एकमूठ तांदूळ अर्पण करावे.
आजचा रंग – तेजस्वी पिवळा

वृश्चिक

आज समिश्र फळे देणारा दिवस आहे. पाठपुरावा करावा. व्यवसायाची स्थिती सुधारणारा दिवस. नोकरदार वर्गाने जबाबदारीपूर्ण वागावे. शिवमानस पुजेचे वाचन करावे.
आजचा रंग – तेजस्वी निळा

धनु

साडेसाती असून देखील कामात उत्साह जाणवेल. उत्साहाच्या भरात क्षमता ओळखून कामे करावीत. कालभैरव अष्टक सकाळी आणि संध्याकाळी वाचावे.
आजचा रंग – तपकिरी

मकर

शुभ संकेतांनी दिवसाची सुरुवात होईल. कामात आवश्यक असलेले सहकार्य लाभेल. व्यावसायिकांना नवीन संधी उपलब्ध होतील. गणपतीची उपासना करून दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – निळा

कुंभ

अधिकाऱ्यांशी वरिष्ठांशी जुळवून घेऊ शकाल. वरिष्ठांची मर्जी राहिल. कोर्ट प्रकरणे मार्गी लागण्याच्या दृष्टीने योग्य दिवस आहे. एकंदरीत पुढील आठवड्याची सुरुवात चांगली होईल. शिवमानस पुजा करावी.
आजचा रंग – निळा

मीन

इतर राशींच्या मानाने आजचा दिवस मीन राशीच्या लोकांसाठी शुभ संकेतांचा आहे. योग्य नियोजन केल्यास दीर्घकाळासाठी लाभप्रद ठरेल. महादेवाच्या मंदिरात पांढरी फुले अर्पण करावी.
आजचा रंग – नारंगी

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu