- मेषः ॐ नरोत्तमाय नमः. आजचा शुभ रंग नारंगी. मोठ्या निर्णयांचा पाठपुरावा करता येईल. महत्त्वाकांक्षी योजना राबविण्याच्या दृष्टीने अनुकूलता प्राप्त होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल. जुने मित्र भेटतील.
- वृषभः ॐ गनाधिपतये नमः. आजचा शुभ रंग आकाशी. कौटुंबीक सौख्याचा दिवस आहे. आप्तेष्ठांमध्ये आनंदी वेळ जाईल. कुटुंबासमवेत प्रवासाचे योग आहेत. व्यवसाय, नोकरीमध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहेत. बांधकाम, शेती, लोखंडाशी निगडीत व्यवसाय करणार्यांना आजचे ग्रहमान अनुकूल आहेत.
- मिथुनः ॐ देवेशाय नमः. आजचा शुभ रंग पांढरा. व्यावसायीक स्पर्धेला सामोरे जावे लागेल. नोकरदार मंडळींनी वरिष्ठांची मर्जी सांभाळून वागावे. विद्यार्थी, गृहिणींना नवीन संधी उपलब्ध होतील. भावंडांच्या गाठीभेटीचे योग आहेत. आप्तेष्ठांमध्ये आनंदी वेळ घालवाल. छोट्या प्रवासाचे योग आहेत.
- कर्कः ॐ स्वस्वरुपाय नमः आजचा शुभ रंग गडद पिवळा. आर्थिक स्थिती उत्तम राहिल. जुनी येणी वसूल करता येतील. कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये गुंतवणूक करणार्यांसाठी उत्तम ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये महत्त्वाकांक्षी योजना राबवू शकाल.
- सिंहः ॐ विठ्ठलाय नमः. आजचा शुभ रंग नारंगी. भाग्यकारक घटनांचा दिवस आहे. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. व्यवसाय, नोकरीमध्ये सुसंधी उपलब्ध होतील. नवीन कामांचा पाठपुरावा करावा. शेती, लोखंड, रसायनांमध्ये गुंतवणूक करणार्यांसाठी उत्तम ग्रहमान आहे.
- कन्याः ॐ प्रभंजनाय नमः. आजचा शुभ रंग गडद निळा. मोठे आर्थिक नियोजन सावधानपणे करावेत. सर्वांशी सलोखा ठेवावा. वरिष्ठांची मर्जी राखावी. नोकरदार मंडळींना अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागेल, त्यामुळे चित्त स्थिर ठेवावे. प्रवासामध्ये दक्षता बाळगावी.
- तुळः ॐ तेजस्विने नमः. आजचा शुभ रंग नारंगी. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. नवीन योजनांचा पाठपुरावा करु शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहिल. प्रवासाचे योग संभवतात. जुने मित्र मंडळी भेटतील.
- वृश्चिकः ॐ चिदरत्नाय नमः. आजचा शुभ रंग पोपटी. अधिकार प्राप्त होतील. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतूक केले जाईल. महत्त्वाच्या कामामध्ये तुमचा सहभाग असेल. अधिकार वर्गांनी सावधपणे निर्णय घ्यावेत. वाहन सौख्य लाभेल.
- धनुः ॐ चिद्प्रशांताय नमः. आजचा शुभ रंग नारंगी. दुरच्या प्रवासाचे योग संभवतात. व्यवसायामध्ये नविन दिशा मिळेल. जुन्या योजना राबविण्याच्या दृष्टीने ग्रहमान योग्य आहेत. जमिनीशी, पाण्याशी, रसायनांशी निगडीत व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. परदेशाशी निगडीत व्यावसायिकांना उत्तम ग्रहमान आहे.
- मकरः ॐ सूदंन्वाय नमः. आजचा शुभ रंग राखाडी. महत्त्वाचे निर्णय घेत असताना सावधानता बाळगावी. वादविवाद टाळावेत. मोठी आर्थिक उलाढाल सावधपणे करावी. कुटुंबासमवेत जास्तीत जास्त वेळ घालवावा. वाहने जपून चालवावी.
- कुंभः ॐ अघनाशकाय नमः. आजचा शुभ रंग आकाशी. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक नियोजन उत्तम राहील. नोकरदार मंडळींना प्रवासाचे योग संभवतात, प्रगतीकारक ग्रहमान आहे. कौटुंबीक सौख्य लाभेल. कौटुंबीक कलह कमी होतील. सर्व क्षेत्रामध्ये स्थिरता प्राप्त होईल.
- मीनः ॐ त्रिलोकेशाय नमः. आजचा शुभ रंग पांढरा. महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. कमोडिटी मार्केट, शेअर्स, बांधकाम व्यावसायीकांनी सावधपणे गुंतवणूक करावी. प्रकृतिची काळजी घ्यावी. उष्णतेचे, पचनाचे विकार असलेल्यांनी विशेष दक्षता बाळगावी. वाहने जपून चालवावी.
– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा