- मेष:-
ऐनवेळी येणाऱ्या अडचणी दूर कराल. जुगारात पडू नका. प्रेमप्रकरणात अडचण येवू शकते. वेळ चुकवून चालणार नाही. मुलांचे मनाविरुद्ध वागणे असेल. - वृषभ:-
राहत्या घराचा प्रश्न सोडवाल. कौटुंबिक गैरसमज दूर करावेत. नोकरदारांना काही बदल करावे लागतील. वाहन चालवितांना सतर्कता द्यावी. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. - मिथुन:-
व्यावसायिक गुंतवणूक कराल. अनेक कामे अंगावर येतील. धीराने सर्व बाबींचा विचार कराल. उत्तम गृहसौख्य लाभेल. मित्र-मैत्रिणींशी जवळीक वाढेल. - कर्क:-
आध्यात्माकडे अधिक कल राहील. धार्मिक क्षेत्रातील व्यक्तीचा सल्ला घ्याल. परोपकाराने वागाल. सज्जन लोकांचा सहवास लाभेल. तुमच्या विचारांचा आदर केला जाईल. - सिंह:-
कामाचे योग्य नियोजन करावे. काही वेळेस दोन पावले मागे येणे योग्य ठरते. काहीं कामे थोडा अधिक काळ घालवतील. मानसिक त्रास दूर करावा. - कन्या:-
गुंतवणुकीतील फायद्याकडे लक्ष द्यावे. आपण कोणाच्या संगतीत आहोत हे लक्षात घ्यावे. जोडीदाराची नाराजी दूर करावी. झोपेची तक्रार दूर होईल. खर्च आवाक्याबाहेर जावू शकतो. - तूळ:-
कौटुंबिक सौख्याचा विचार कराल. मध्यस्थीच्या कामातून चांगला फायदा संभवतो. तुमचा मान वाढेल. जमिनीच्या कामातून लाभ होईल. आरोग्यात सुधारणा होईल. - वृश्चिक:-
व्यावसायिक शत्रुत्व ओढवून घेवू नका. कष्ट अधिक वाढू शकतात. तुमची अंगची चिकाटी उपयोगी ठरेल. मनीच्या आकांक्षा पूर्ण होतील. अधिकारी व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. - धनु:-
वडिलधाऱ्यांचा मान राखावा. कामासंबंधी वाटणारी चिंता दूर करावी. क्षुल्लक गोष्टींनी नाराज होण्याचे कारण नाही. हातातील कामात अपेक्षेनुसार यश येईल असे नाही. वरिष्ठांचा मान राखावा. - मकर:-
तुमच्या बोलण्याचा चांगला प्रभाव पडेल. अभ्यासूपणे गोष्टी समजून घ्याव्यात. शिस्तीचा बडगा करू नये. प्रवासाची आवड जोपासाल. बौद्धिक छंद जोपासाल. - कुंभ:-
कफविकाराचा त्रास जाणवू शकतो. भावंडाना मदत करावी लागेल. जुनी येणी वसूल होतील. सासुरवाडीची मदत मिळेल. गुद्मार्गाच्या विकारांवर लक्ष द्यावी लागेल. - मीन:-
दिवस आनंददायी असेल. कामात कोणीतरी खुसपट काढेल. काही कारणाने विकलता येईल. गटबाजी करू नये. मुख्यत: जोडीदाराला सांभाळा.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
आजचे राशीभविष्य, सोमवार, १६ सप्टेंबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 16-09-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi monday 16 september 2019 aau