- मेष:-
कामानिमित्त घरापासून दूर राहावे लागेल. फसवणुकीपासून सावध राहावे. देणी द्यावी लागतील. एकाच गोष्टीचा फार वेळ विचार करू नका. खेळात मन रमवाल. - वृषभ:-
व्यावसायिक आवक चांगली राहील. जुने मित्र भेटतील. मोठ्या भावाचे सहकार्य लाभेल. नवीन वाहन खरेदीचा विचार कराल. शेतीच्या कामात यश येईल. - मिथुन:-
कामाचा विस्तार वाढवावा. कौतुकास पात्र व्हाल. शासकीय कामांकडे लक्ष द्यावे. पराक्रमाला वाव मिळेल. साहसाने कामे हाती घ्यावीत. - कर्क:-
दूरच्या प्रवासाचा योग येईल. तुमची प्रतिमा उंचावेल. घरात किरकोळ बदल कराल. कामातील तांत्रिक बाबी जाणून घ्याव्यात. उताविळपणा करू नका. - सिंह:-
कामाचा ताण वाढू शकतो. हट्टीपणा बाजूला सारून विचार करावा. ध्येयाचा पाठपुरावा करावा. काही कामे वेळ काढतील. मागे हटू नका. - कन्या:-
नैराश्य बाजूला सारून विचार करावा. काही वेळेस दोन पावले मागे येणे उत्तम. खर्चाकडे लक्ष द्यावे. सर्व बाबी उघडपणे मांडू नका. झोपेची तक्रार जाणवेल. - तुळ:-
हाताखालील व्यक्तींची उत्तम साथ मिळेल. कामातून समाधान शोधाल. विरोधकांवर मात कराल. जबाबदार व्यक्तींची ओळख होईल. व्यावसायिक फायदा जाणून घ्यावा. - वृश्चिक:-
मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. पैज जिंकता येईल. मैत्री अधिक घट्ट होईल. कामात अपेक्षित बदल कराल. काही गोष्टी सबुरीने घ्याव्यात. - धनु:-
कौटुंबिक गोष्टीत अधिक रस घ्याल. घरातील कामात वेळ निघून जाईल. बागकामाची आवड पूर्ण कराल. वरिष्ठांची नाराजी ओढवून घेवू नका. वडिलधाऱ्यांच्या शब्दाला मान द्यावा. - मकर:-
मुलाखतीत यश येईल. मध्यस्थाचे काम कराल. आवडते साहित्य वाचाल. सहकुटुंब जवळची सहल काढाल. जोडीदाराची बौद्धिक बाजू लक्षात येईल. - कुंभ:-
कौटुंबिक बाबीत अधिक लक्ष घालावे. मुलांचे कौतुक कराल. चुकीच्या संगतीत अडकू नका. गोड पदार्थ चाखायला मिळतील. मतभेद दर्शवू नका. - मीन:-
आरोग्यात सुधारणा होईल. कष्टाचे फळ मिळेल. कामातून समाधान लाभेल. हाताखालील लोकांचे सहकार्य लाभेल. चुगली करणाऱ्या लोकांपासून दूर राहावे.या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन कराया बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन कराAlready have an account? Sign inसर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठीसबस्क्रिप्शनचे फायदेहजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आजचे राशीभविष्य, सोमवार, १९ ऑगस्ट २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 19-08-2019 at 00:01 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi monday 19 august 2019 aau