मेष

पूर्वी केलेल्या कामांचा पाठपुरावा करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. कर्ज प्रकरणांचे, स्थावर मालमत्तेचे योग येण्याची शक्यता आहे. ओम ऱ्हीं क्लीं शिवाय नमः या बीज मंत्राचे उच्चारण करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – तपकिरी

वृषभ

वृषभ राशीसाठी आजचा दिवस आनंदीमय आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. कुटुंबातही सर्वांचे सहकार्य लाभेल. आजचा दिवस आर्थिक नियोजनासाठी उत्तम असेल. महिलांनी खर्चावर नियंत्रण ठेवावे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग- लाल

मिथुन

आठवड्याची सुरुवातमध्ये सिंह राशीत चंद्र असल्याने वरिष्ठांची मर्जी सांभाळावी. काही महत्त्वाच्या कामांची जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. ती आज काळजीपूर्वक पार पाडल्यास कारकीर्दीस फायदा होईल. घरातील देवाला दही भाताचा नेवैद्य दाखवा.
आजचा रंग- तेजस्वी पिवळा

कर्क

नोकरी व्यवसायामध्ये धडाडीने घेतलेल्या निर्णयांचे कौतुक होईल. काही नवीन गोष्टी शिकण्याचा योग आहे. सद्गुरुचे स्मरण करावे. गुरू मंत्राचा जप करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – पांढरा

सिंह

सर्व कामांच्या दृष्टीने आणि पाठपुराव्यासाठी उत्तम दिवस आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. घरातील ज्येष्ठांची विचारपूस करावी. ओम नमः शिवायचा जप करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग- लाल

कन्या

आठवड्याची सुरुवात सावधपणे करावी. बोलताना काळजीपूर्वक बोलावे. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी. कुलदैवत आणि कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – निळा

तुळ

तुमच्या व्यावसायिक आणि नोकरीमधील धाडसांचे कौतुक होईल. उत्साहात दिवसाला सुरुवात कराल. महादेवाचे दर्शन घेऊन, दक्षिणा अर्पण करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग- पोपटी

वृश्चिक

आठवड्याची सुरुवात ही शुभसंकेताने होऊ शकते. आज घेतलेल्या निर्णयाचा चांगला फायदा होऊ शकतो. गणपती आणि महादेव मंदिरामध्ये फुले अर्पण करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – तांबडा

धनु

दिवसाची सुरुवात वरिष्ठांच्या सांगण्यानुसार करावी. वादावादी टाळावी. वाद वाढल्यास संपूर्ण आठवड्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. ओम शांभवे नमः हा जप करावा.
आजचा रंग – तांबडा

मकर

आठवड्याची सुरुवात सावधपणे करावी. महत्त्वाच्या कामांचे निर्णय घेऊ नये. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. महादेवाची उपासना करावी.

कुंभ

आठवड्याची सुरुवात व्यावसायिकांसाठी चांगल्या संधी घेऊन येणारी आहे. गृहसौख्य लाभेल. कुटुंबासोबत उत्तम वेळ घालवू शकाल. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – पांढरा

मीन

आठवड्याची सुरुवात करताना सहकाऱ्यांना गृहित धरू नये. त्यांच्या मदतीची आवश्यकता असणार आहे. शांतपणे सर्वांचे सहकार्य घेऊन आठवड्याची सुरुवात करावी. कालभैरव आणि महादेव मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावे.
आजचा रंग- राखाडी

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu