• मेष:-
    परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्यावे. जोडीदाराबरोबर वाद घालू नका. मतभेदापासून दूर राहावे. भगीदाराची बाजू समजून घ्यावी. स्वभावविरोधाला सामोरे जावे लागेल.
  • वृषभ:-
    उष्णतेचे त्रास जाणवतील. कामाच्या ठिकाणी अधिकार गाजवाल. केलेल्या कामातून समाधान मिळेल. चहाडखोर व्यक्तींपासून दूर राहावे. अकारण चिडचिड होऊ शकते.
  • मिथुन:-
    कौटुंबिक समस्यांकडे लक्ष द्यावे. मुलांच्या स्वतंत्र गोष्टींचा बाऊ करू नका. कौटुंबिक स्वास्थ जपावे. चपळाईने कामे कराल. कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल.
  • कर्क:-
    घरगुती प्रश्न सामोरे येतील. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे लागेल. जमिनीची कामे पार पडतील. सतत कार्यरत राहाल. श्रम वाढतील.
  • सिंह:-
    न डगमगता कामे हाती घ्याल. वैचारिक मतभेद टाळावेत. आपल्याच मतावर आग्रही राहाल. परिस्थिती समजून वागाल. इतरांची बाजू प्रांजळपणे समजून घ्याल.
  • कन्या:-
    दिवस खटपट करण्यात जाईल. कष्टाला घाबरून जाऊ नका. मनात येईल त्याप्रमाणे खरेदी कराल. जरुरी नसतांना उदारपणे वागाल. बोलतांना सावधगिरी बाळगा.
  • तूळ:-
    इतरांवर तुमचा रुबाब पडेल. आपलेच मत खरे कराल. कामाचा हुरूप वाढेल. अडथळ्यातून मार्ग काढता येईल. उतावीळपणे वागू नका.
  • वृश्चिक:-
    दूरच्या प्रवासाचा योग येईल. सामुदायिक बाबीत लक्ष घालू नका. पोटाची काळजी घ्यावी. समयसुचकता बाळगावी लागेल. मानसिक त्रास संभवतो.
  • धनु:-
    योग्य संधीची वाट पाहावी लागेल. मुलांच्या वागण्याकडे लक्ष द्यावे. अधिक श्रम घ्यावे लागतील. सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा. खटपट करून काम मिळवाल.
  • मकर:-
    अनपेक्षित बदल घडून येतील. बदलीची शक्यता आहे. एककल्ली विचार करू नका. कामे जलद गतीने करण्यावर भर द्याल. स्थावरची कामे उरकली जातील.
  • कुंभ:-
    प्रवासात सतर्कता दाखवावी. कामाची तांत्रिक बाजू जाणून घ्यावी. सासुरवाडीच्या मंडळींशी सलोखा ठेवावा. स्वकष्टावर अधिक लक्ष द्यावे. उपासनेला अधिक बळ मिळेल.
  • मीन:-
    स्त्रियांना आरोग्याची काळजी घ्यावी. किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष करू नका. मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. नसत्या वादात अडकू नका. गैरसमजापासून दूर राहा.
    या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi monday 23 december 2019 aau
Show comments