- मेष:-
सहज मिळणाऱ्या गोष्टींनी हुरळून जावू नये. भावंडांचे सहकार्य मिळेल. मित्रांशी सलोखा वाढवावा. मनाची द्विधावस्था टाळण्याचा प्रयत्न करावा. जवळचा प्रवास कराल. - वृषभ:-
संयमाची जोड घ्यावी लागेल. फार काळ विचार करत बसू नका. आपल्या मतावर ठाम राहाल. घरातील कामे आवडीने पार पाडाल. किरकोळ खरेदीत वेळ घालवाल. - मिथुन:-
एकावेळी अनेक कामे हातात घेवू नयेत. आपले वेगळेपण सिध्द करावे. ठाम निर्णय घ्यावेत. कामाचा आवाका लक्षात घेवून त्याप्रमाणे नियोजन करावे. - कर्क:-
आवक-जावक यांची उजळणी करावी. गोड बोलण्यावर भर द्यावा लागेल. जबाबदाराची जाणीव ठेवाल. तब्बेतीची काळजी घ्यावी. खर्च वाढू शकतो. - सिंह:-
उत्साहाला आवर घालावी लागेल. कामामुळे थकवा जाणवेल. फार ताण घेवू नका. वेळ आणि काम यांची योग्य सांगड घालावी लागेल. दिरंगाई टाळावी. - कन्या:-
उघडपणे बोलणे टाळावे. जनविरोधापासून दूर राहावे. सामाजिक बाजू लक्षात घ्यावी. अपेक्षित लाभाचा आनंद घ्याल. झोपेची तक्रार दूर करावी. - तुळ:-
अधिकारी व्यक्तीच्या ओळखीचा फायदा होईल. कामात स्त्रियांची मदत मिळेल. व्यावसायिक लाभाचा दिवस. नम्रपणे वागावे. दृष्टीकोन बदलून पाहावा. - वृश्चिक:-
कामातील बदल जाणून घ्यावा. कार्यप्रविणता वाढीस लागेल. अतिउत्साह टाळावा. अचानक धनलाभाची शक्यता. सारासार विचारला प्राधान्य द्यावे. - धनु:-
चुकीचे विचार मनातून काढून टाका. वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे. कामातून आनंद शोधावा. गैरसमजुतीत अडकू नका. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. - मकर:-
गप्पांमध्ये रमून जाल. जोडीदाराच्या व्यवहार चातुर्याचे कौतुक कराल. मुलांच्या तक्रारीकडे लक्ष द्या. पोटाची तक्रार जाणवू शकते. बाहेरील पदार्थ खाणे टाळावे. - कुंभ:-
बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. उष्णतेचे विकार जाणवतील. अकारण चीड-चीड करू नये. फसवणुकीपासून सावध राहावे. चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नये. - मीन:-
काही कामे रेंगाळतील. कामाच्या ठिकाणी प्रभुत्व गाजवाल. आपलेच म्हणणे खरे कराल. घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करावा. मनाची द्विधावस्था टाळावी.
– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
आजचे राशीभविष्य, सोमवार, २६ ऑगस्ट २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन
First published on: 26-08-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi monday 26 august 2019 aau