मेष

वृश्चिक राशीतील चंद्र मेष राशीला शुभ नसणार. वादविवाद टाळावेत. आज आठवड्याची सुरुवात सावधपणे करावी. महादेव मंदिरामध्ये फुले अर्पण करावी.
आजचा रंग – नारंगी

वृषभ

आठवड्याची सुरुवात आशादायक होऊ शकते. नोकरीत कामाच्या प्रभावाने वरिष्ठ खुश होतील. जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडाव्यात. नवीन संधी उपलब्ध होतील. ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – नारंगी

मिथुन

आज सोम प्रदोष आठवड्याचे सुरुवात करताना कामांचे नियोजन करावे. बैठकीची, पूर्वपरीक्षेची तयारी करुन जावे, महिलांचे काम वाढण्याची शक्यता आहे. सर्व परिस्थितीला सामोरे जावे. महादेवाच्या मंदिरात धान्य आणि पांढरी फुले अर्पण करावी.
आजचा रंग – निळा

कर्क

आज चंद्र वृश्चिकेत आहे. त्यामुळे नवपंचम योगाचा कर्केला लाभ होऊ शकतो. गृहिणी, विद्यार्थी, व्यापार, व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. एकंदरीत आठवड्याची सुरुवात अत्यंत शुभ होणार आहे. ओम नमः शिवाय जप करावा.
आजचा रंग – पांढरा

सिंह

आज अधिकारी वर्गाचे, वरिष्ठांचे तुमच्यावर विशेष लक्ष आणि मर्जी असेल. योग्य उपयोग करुन आपल्या स्वभावानुसार धडाडीने निर्णय घ्यावे. विद्यार्थी वर्गाला उत्साही दिवस आहे. ओम नमः शिवाय जप करावा.
आजचा रंग –  पिवळा

कन्या

आज संपूर्ण दिवस चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत असणार आहे. लाभदायक ग्रहदशा असणार आहे. अनेक चांगल्या घडामोडींनी आठवड्याची सुरुवात होईल. सर्व क्षेत्रातील व्यक्तींना लाभदायक दिवस. महादेवाच्या मंदिरात अभिषेक करणे.
आजचा रंग – पांढरा

तुळ

आठवड्याच्या सुरुवातीलाच चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत असणार आहे. आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी योग्य दिवस आहे. साडेसातीला चुकलेली कामे, नियोजने सुधारण्यासाठी योग्य दिवस आहे. वेळेचा पूर्ण उपयोग करावा. ओम नमः शिवाय जप दिवसभर मनातल्या मनात सुरू ठेवावा.
आजचा रंग निळा

वृश्चिक

आठवड्याची सुरुवात उत्तम ग्रह योगाने होत आहे. चंद्राचे भ्रमण स्वराशीत असल्याने कामात प्रभाव राहील. आठवड्याचे नियोजन उत्तम करू शकाल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. ओम सोमाय नमः जप करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग निळा

धनु

आठवड्याची सुरुवात नियोजनाने करावी. क्षमतेपेक्षा जास्त कामांची जबाबदारी घेऊ नये. क्षमता ओळखून काम करावे. ओम नमः शिवाय जप करावा.
आजचा रंग – तपकिरी

मकर

आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. सावध राहावे, अति उत्साहात कामाची जबाबदारी घेऊ नये. स्वतःची क्षमता ओळखून काम करणे. वादविवाद टाळावेत. मोजके पण अचूक योग्य काम करणे. कुलदैवतेचे स्मरण करुन दर्शन घ्यावे.
आजचा रंग- निळा

कुंभ

आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. आठवड्याची सुरुवात आशादायक, वरिष्ठांकडून मोठ्या जबाबदाऱ्यासाठी तुमची निवड, क्षमतेपेक्षा जास्त शब्दात अडकू नये. ओम नमः शिवाय जप करावा.
आजचा रंग – निळा

मीन

आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. सर्व कामांसाठी उत्तम दिवस, अनेक जुन्या कामांना यश येईल. योग्य वेळी मार्गदर्शन लाभेल. आठवड्याची सुरुवात आनंद आणि उत्साहात होईल. संध्याकाळी महादेवाचे दर्शन घेणे. पशुपक्षांना अन्नदान करणे.
आजचा रंग – तपकिरी

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

Story img Loader