- मेष:-
सर्वांना आनंदाने वागवाल. व्यापार्यांना चांगला धनलाभ संभवतो. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. स्त्रीसमूहात वावराल. दिवस आळसात जाईल. - वृषभ:-
कामात वारंवार बदल करू नयेत. सामाजिक वजन वाढेल. काही गोष्टींना पुरेसा वेळ द्यावा. व्यापारीवर्ग खुश राहील. वडीलधार्यांना नाराज करू नये. - मिथुन:-
धार्मिक कामात हातभार लावाल. तुमची लोकप्रियता वाढेल. शैक्षणिक कामे मार्गी लागतील. सामाजिक सेवेची इच्छा दर्शवाल. चांगली कल्पनाशक्ति लाभेल. - कर्क:-
अचानक धनलाभ संभवतो. कामे कमी श्रमात पार पडतील. काही गोष्टी तडकाफडकी घडतील. जुन्या दुखण्यांकडे लक्ष द्यावे. फार विचार करू नये. - सिंह:-
कौटुंबिक सौख्य जपावे. जोडीदाराची चांगली साथ राहील. पत्नीच्या प्रेमळपणाची जाणीव होईल. वैवाहिक सौख्यात भर पडेल. एकमेकांना समजून घ्याल. - कन्या:-
क्षुल्लक गोष्टी फार मनावर घेऊ नका. परिस्थितीला नावे ठेवू नका. किरकोळ गोष्टीं नजरेआड कराव्यात. मानसिक चंचलता जाणवेल. जवळच्या प्रवासात सतर्क राहावे. - तूळ:-
सर्व बाबी नीट समजून घ्याल. तरलतेने वागाल. जुगाराची आवड पूर्ण कराल. स्वच्छंदीपणे वागाल. विचारांना योग्य दिशा द्याल. - वृश्चिक:-
उत्तम वाहन सौख्य लाभेल. महिलांना कर्तेपणाचा मान मिळेल. घराची स्वच्छता काढली जाईल. उत्तम गृहसौख्य लाभेल. दिवस मजेत घालवाल. - धनू:-
भावंडांशी सलोखा वाढेल. मनाची संवेदनशीलता दाखवाल. नवनवीन गोष्टी जाणून घ्याल. हातातील कलेत वेळ व्यतीत कराल. आवडते वाद्य वाजवाल. - मकर:-
गायन कलेचे कौतुक केले जाईल. व्यापारी वर्ग खुश राहील. उत्तम व्यावसायिक लाभ संभवतो. आवडीचे पदार्थ चाखाल. मौल्यवान वस्तू खरेदी कराल. - कुंभ:-
सर्वांना आपलेसे कराल. वागण्यातून सज्जनपणा दर्शवाल. तुमच्या व्यक्तिमत्वाची उत्तम छाप पडेल. दिवस आनंदात जाईल. कला जोपासायला वेळ काढाल. - मीन:-
मानसिक चंचलता जाणवेल. चित्त एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा. उघडपणे बोलणे टाळाल. विचारात वाहून जाऊ नका. अधिकार्यांची गाठ घ्याल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
आजचे राशीभविष्य, सोमवार, २७ जानेवारी २०२०
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन
First published on: 27-01-2020 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi monday 27 january 2020 aau