मेष:- तुमची कार्यशक्ती वाढेल. स्वभावात लहरिपणा येईल. इतर कोणाचे बाह्य दडपण सहन होणार नाही. स्वतः च्या हिमतीवर विश्वास ठेवाल. संशोधनाकडे कल राहील. वृषभ:- जोडीदाराची बाजू जाणून घ्यावी. एकमेकांत मतभेदाला थारा देऊ नका. भागीदारीत सलोख्याचे संबंध ठेवा. योग्य संधीची वाट पाहावी. सामाजिक संबंध दृढ होतील. मिथुन:- मानसिक चांचल्य जाणवेल. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावी लागतील. चुकीच्या व्यक्तींच्या सहवासात येण्याची शक्यता आहे. उष्णतेचे विकार बळावू शकतात. जोडीदाराची काळजी घ्यावी. कर्क:- धडाडी दाखवण्याची संधी येईल. चांगली प्रतिभा लाभेल. कलेला चांगले पोषक वातावरण मिळेल. मुलांच्या कारवाया वाढू शकतात. स्वतंत्र विचार दर्शवाल. सिंह:- प्रवासाचा योग येईल. नवनवीन विचार मांडाल. गूढ गोष्टी जाणून घेण्यात रस दाखवाल. तुमची बुद्धिमत्ता दिसून येईल. कामात कल्पकतेची जोड घ्याल. कन्या:- बाहेरील पदार्थ खाण्याचे टाळावे. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. हातातील अधिकाराचा योग्य वापर करावा. घराची स्वच्छता काढाल. कलात्मक दृष्टिकोन ठेवावा. तूळ:- फसवणुकीपासून सावध राहावे. घराबाहेर वावरतांना मौल्यवान वस्तू सांभाळा. द्वेषाला मनातून काढून टाकावे. एखादेवेळी अपयश पदरी पडू शकते. खर्च आटोक्यात ठेवावा. वृश्चिक:- किरकोळ जखम होऊ शकते. कोणाशीही उगाच शत्रुत्व घेऊ नका. रक्तदाब असणाऱ्यांनी काळजी घ्यावी. चटकन निराश होण्याचे कारण नाही. अडचणीतून मार्ग निघेल. धनु:- जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. काही खर्च आवाक्याबाहेर जाऊ शकतात. अकारण चिंता मनात डोकावू शकते. पायाच्या स्नायूंचा त्रास जाणवू शकतो. वेळेत कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. मकर:- कौटुंबिक सुखात वाढ होईल. मध्यस्थीच्या कामातून लाभ होईल. तुमचा मान वाढेल. व्यावसायिक बदल योग्य ठरतील. तुमची कार्यक्षमता वाढेल. कुंभ:- प्रयत्नात कसूर करून चालणार नाही. कष्ट वाढू शकतात. कामाच्या ठिकाणी इतर गोष्टीत लक्ष घालू नका. वादातून शत्रुत्व पत्करू नका. अधिकाऱ्यांचा सल्ला विचारात घ्यावा. मीन:- प्रवासात सावधानता बाळगावी. वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे. घरातील ज्येष्ठांचा योग्य तो मान राखावा. मानसिक चिंता बाजूला साराव्यात. सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा. – ज्योतिषी विद्याधर करंदीकर