• मेष:-
    तुमची कार्यशक्ती वाढेल. स्वभावात लहरिपणा येईल. इतर कोणाचे बाह्य दडपण सहन होणार नाही. स्वतः च्या हिमतीवर विश्वास ठेवाल. संशोधनाकडे कल राहील.
  • वृषभ:-
    जोडीदाराची बाजू जाणून घ्यावी. एकमेकांत मतभेदाला थारा देऊ नका. भागीदारीत सलोख्याचे संबंध ठेवा. योग्य संधीची वाट पाहावी. सामाजिक संबंध दृढ होतील.
  • मिथुन:-
    मानसिक चांचल्य जाणवेल. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावी लागतील. चुकीच्या व्यक्तींच्या सहवासात येण्याची शक्यता आहे. उष्णतेचे विकार बळावू शकतात. जोडीदाराची काळजी घ्यावी.
  • कर्क:-
    धडाडी दाखवण्याची संधी येईल. चांगली प्रतिभा लाभेल. कलेला चांगले पोषक वातावरण मिळेल. मुलांच्या कारवाया वाढू शकतात. स्वतंत्र विचार दर्शवाल.
  • सिंह:-
    प्रवासाचा योग येईल. नवनवीन विचार मांडाल. गूढ गोष्टी जाणून घेण्यात रस दाखवाल. तुमची बुद्धिमत्ता दिसून येईल. कामात कल्पकतेची जोड घ्याल.
  • कन्या:-
    बाहेरील पदार्थ खाण्याचे टाळावे. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. हातातील अधिकाराचा योग्य वापर करावा. घराची स्वच्छता काढाल. कलात्मक दृष्टिकोन ठेवावा.
  • तूळ:-
    फसवणुकीपासून सावध राहावे. घराबाहेर वावरतांना मौल्यवान वस्तू सांभाळा. द्वेषाला मनातून काढून टाकावे. एखादेवेळी अपयश पदरी पडू शकते. खर्च आटोक्यात ठेवावा.
  • वृश्चिक:-
    किरकोळ जखम होऊ शकते. कोणाशीही उगाच शत्रुत्व घेऊ नका. रक्तदाब असणाऱ्यांनी काळजी घ्यावी. चटकन निराश होण्याचे कारण नाही. अडचणीतून मार्ग निघेल.
  • धनु:-
    जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. काही खर्च आवाक्याबाहेर जाऊ शकतात. अकारण चिंता मनात डोकावू शकते. पायाच्या स्नायूंचा त्रास जाणवू शकतो. वेळेत कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.
  • मकर:-
    कौटुंबिक सुखात वाढ होईल. मध्यस्थीच्या कामातून लाभ होईल. तुमचा मान वाढेल. व्यावसायिक बदल योग्य ठरतील. तुमची कार्यक्षमता वाढेल.
  • कुंभ:-
    प्रयत्नात कसूर करून चालणार नाही. कष्ट वाढू शकतात. कामाच्या ठिकाणी इतर गोष्टीत लक्ष घालू नका. वादातून शत्रुत्व पत्करू नका. अधिकाऱ्यांचा सल्ला विचारात घ्यावा.
  • मीन:-
    प्रवासात सावधानता बाळगावी. वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे. घरातील ज्येष्ठांचा योग्य तो मान राखावा. मानसिक चिंता बाजूला साराव्यात. सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा.
    या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi monday 30 december 2019 aau
Show comments