- मेष:-
व्यवहार कुशलता दाखवाल. जोडीदाराच्या सुस्वभाविपणाचे कौतुक कराल. तिरसटपणे वागू नका. करमणुकीवर अधिक लक्ष द्याल. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. - वृषभ:-
कौटुंबिक कार्यक्रम व्यवस्थित पार पडतील. दिवस खेळकरपणे जाईल. इतरांचा विश्वास संपादन करावा लागेल. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत अडकाल. व्यापाऱ्यांनी काटेकोरपणे वागावे. - मिथुन:-
घरातील आवराआवर करण्यात वेळ जाईल. अति चिकित्सा करू नका. बौद्धिक छंद जोपासा. आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना फायदा संभवतो. घरात नातेवाईक गोळा होतील. - कर्क:-
नवीन मित्र जोडाल. नातेवाईकांच्यात उठबस वाढेल. ज्येष्ठांची चांगली मदत मिळेल. तुमच्यातील प्रेमळपणा दिसून येईल. सर्वांची यथायोग्य विचारपूस कराल. - सिंह:-
चौकसपणे गोष्टी जाणून घ्याल. तुमचा तर्क योग्य निघेल. लहान प्रवास कराल. विचार आणि बुद्धी यांची सांगड घालाल. उत्कृष्ट परीक्षण कराल. - कन्या:-
तुमच्या बोलण्याचा इतरांवर प्रभाव पडेल. गायन कलेची आवड जोपासाल. मध्यस्थीचा फायदा होईल. आपला फायदा चलाखीने काढून घ्याल. गोड बोलून कामे पूर्ण करून घ्याल. - तूळ:-
इतरांच्या सल्ल्याने वागू नये. हातातील अधिकाराचा योग्यवेळी वापर करावा. नवीन गोष्टी आवडीने जाणून घ्याल. हजरजबाबीपणे वागणे ठेवाल. कामात तत्परता दाखवाल. - वृश्चिक:-
कागदपत्रे व्यवस्थित तपासून घ्यावीत. मनाजोगा आर्थिक लाभ होईल. कामात स्त्रीवर्गाचा हातभार लागेल. सचोटीने कामे करण्यावर भर द्याल. प्रवासाची आवड पूर्ण कराल. - धनु:-
गप्पिष्ट लोकांमध्ये रमाल. लहानांशी खेळण्यात रमून जाल. व्यापाऱ्यांना चांगला फायदा संभवतो. तरुणांची मते जाणून घ्याल. प्रकृतीची वेळेवर तपासणी करावी. - मकर:-
कल्पकतेने मार्ग काढाल. व्यावहारिक चातुर्य दाखवाल. पुढील परिस्थितीचा अंदाज घ्याल. तुमचा संपर्क वाढेल. वरिष्ठांची मर्जी संपादन करावी. - कुंभ:-
शिस्तीने वागणे पसंद कराल. बोलण्याने सर्वांना अचंबित कराल. बैठ्या खेळात यश येईल. व्यावसायिक ज्ञान वाढवाल. अभ्यासूपणे गोष्टी जाणून घ्याल. - मीन:-
कफविकाराचा त्रास जाणवू शकतो. अतिविचार करत बसू नका. तुमचे अनुमान योग्य ठरतील. प्रेमळ संबंधात रंगून जाल. जोडीदाराचा हट्ट पुरवाल.आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर कराAlready have a account? Sign in– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
First published on: 30-09-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi monday 30 september 2019 aau