मेष
ओम ऱ्हीं क्लीं शिवाय नम: या बीज मंत्राचे उच्चारण करून दिवसाची सुरूवात करावी. चंद्राचे भ्रमण कन्या राशीमध्ये असेल. प्रकृतीची काळजी घ्यावी. प्रवास जपून करावे. वादविवाद टाळावे. कामगारांशी जुळवून घ्यावे. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
आजचा रंग – राखाडी

वृषभ
ओम नम: शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करून दिवसाची सुरूवात करावी. चंद्राचे भ्रमण कन्याराशीमध्ये असेल. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान. नोकरदारांना मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. आर्थिक नियोजन उत्तम राहील. दूरच्या प्रवासाचे योग.
आजचा रंग – पांढरा

मिथुन
घरातील देवाला दही-भाताचा नैवेद्य दाखवावा. चंद्राचे भ्रमण कन्या राशीमध्ये असेल. कौटुंबिक सौख्याचा दिवस. कुटुंबासमवेत सहलीचे किंवा प्रवासाचे योग. राहत्या घराचे प्रश्न सोडवू शकाल. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा.
आजचा रंग – नारंगी

कर्क
सद्गुरूचे स्मरण करावे. गुरूमंत्राचा जप करून दिवसाची सुरूवात करावी. चंद्राचे भ्रमण कन्या राशीमध्ये असेल. धाडसी निर्णय घेऊ शकाल. भावंडाशी, आप्तेष्टांशी वाद टाळावेत. प्रवासाचे योग संभवतात. पगारवाढ किंवा बदलीसाठी प्रयत्न करावेत. व्यवसायामध्ये कामगिरी उत्तम राहील.
आजचा रंग – हिरवा

सिंह
ओम नम: शिवाय या मंत्राचा जप करून दिवसाची सुरूवात करणे. चंद्राचे भ्रमण कन्या राशीमध्ये असेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसाय, नोकरीमध्ये आर्थिक नियोजन करू शकाल. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. नवीन गाठीभेटी होतील. आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना योग्य दिवस. सर्वांचे सहकार्य लाभेल.
आजचा रंग – पोपटी

कन्या
कुलदैवत आणि कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे. चंद्राचे भ्रमण कन्या राशीमध्ये असेल. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्वाच्या कामांचे निर्णय घ्यावेत. महत्वकांक्षी योजना राबवण्यासाठी उत्तम ग्रहमान. चांगल्या प्रवासाचे योग येतील. व्यावसायिकांना चांगल्या संधी उपलब्ध होतील.
आजचा रंग – गुलाबी

तुळ
महादेवाचे दर्शन घेऊन दक्षिणा अर्पण करून दिवसाची सुरूवात करावी. दुपारी साडेबारानंतर चंद्राचे भ्रमण कन्या राशीमध्ये असेल. आर्थिक उलाढाल जपून करावी. वादविवाद टाळावेत. स्थावर मालमत्ता, शेअरशी निगडीत मंडळींनी काळजी घ्यावी. मोठी गुंतवूणक करत असताना वरिष्ठांचा सल्ला घ्यावा. उष्णतेच्या विकारांची काळजी घ्यावी.
आजचा रंग – गुलाबी

वृश्चिक
गणपती आणि महादेव मंदिरामध्ये फुले अर्पण करून दिवसाची सुरूवात करावी. चंद्रचे भ्रमण कन्या राशीमध्ये असेल. सर्व लाभांसाठी उपयुक्त दिवस. महत्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी करावी. महत्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. आर्थिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी. प्रवासाचे योग.
आजचा रंग – गडद निळा

धनु
ओम शांभवे नम: या मंत्राचा जप करावा. चंद्राचे भ्रमण कन्या राशीमध्ये असेल. अधिकारी वर्गासाठी लाभदायक संधी उपलब्ध होतील. ज्येष्ठांशी निगडीत सुवार्ता समजेल. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. आर्थिक येणी वसूल होण्याच्या दृष्टीने चांगला दिवस. नोकरीमध्ये मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. कामाचा ताण वाढेल.
आजचा रंग – निळा

मकर
ओम नम: शिवाय या मंत्राचा जप करावा. महादेवाची उपासना करावी. चंद्राचे भ्रमण कन्या राशीमध्ये असेल. सुसंधी प्राप्त होतील. नोकरी व्यवसायामध्ये उत्तम सहकार्य लाभेल. परदेशाशी निगडीत व्यापार. नोकरीमध्ये चांगल्या संधी निर्माण होतील. कामाचा ताण वाढेल. प्रवासाचे योग.
आजचा रंग – नारंगी

कुंभ
ओम नम: शिवाय मंत्राचा जप करावा. चंद्राचे भ्रमण कन्या राशीमध्ये असेल. प्रवास जपून करावेत. आर्थिक निर्णय घेताना सल्लामसलत करावी. सहकाऱ्यांशी, कामगारांशी वादविवाद टाळावेत. स्थावर मालमत्तेचे व्यवहार सावधपणे करावे. वातविकार आणि उष्णतेचे विकार असलेल्यांनी काळजी घ्यावी.
आजचा रंग – पांढरा

मीन
कालभैरव आणि महादेव मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावे. चंद्राचे भ्रमण कन्याराशीमध्ये असेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. नवीन कामांचा पाठपुरावा करावा. प्रवासाचे योग आहेत.
आजचा रंग – आकाशी

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

Story img Loader