- मेष:-
कामे यथायोग्य पार पडतील. दिवस मनाप्रमाणे घालवाल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. जुनी येणी वसूल होतील. कामाच्या ठिकाणी सतर्क राहावे. - वृषभ:-
जोडीदाराचे वर्चस्व राहील. किरकोळ मतभेद संभवतात. मानसिक स्थैर्य जपावे. अतिविचार करणे टाळावे. उगाचच दुराग्रह करू नका. - मिथुन:-
वैवाहिक सौख्याकडे लक्ष द्यावे. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. जोडीदाराच्या मताचा विचार करावा. मनातील गैरसमज दूर करावेत. चांगला व्यावसायिक लाभ संभवतो. - कर्क:-
कामाची धांदल राहील. घाईने कोणत्याही गोष्टी उरकू नका. मुलांचा व्रात्यपणा वाढू शकतो. मैदानी खेळाची आवड पूर्ण कराल. जोडीदाराची कमाई वाढेल. - सिंह:-
कौटुंबिक गोष्टीत अधिक लक्ष घालावे. जमिनीची कामे तूर्तास करू नयेत. तब्येतीत काहीसा फरक पडेल. क्षुल्लक कारणावरून दुरावा वाढवू नका. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. - कन्या:-
प्रवासात काळजी घ्यावी. नातेवाईकांशी दुरावा वाढू शकतो. जोडीदाराचे मत विरोधी वाटू शकते. अचानक धनलाभ संभवतो. मुलांच्या समस्या जाणून घ्याव्यात. - तूळ:- बोलतांना भान राखावे. अनावश्यक खर्च वाढेल. प्रवासात काहीसा त्रास जाणवेल. नातेवाईकांचे प्रश्न सोडवावे लागतील. हातातील कामावर अधिक लक्ष द्यावे.
- वृश्चिक:-
क्रोधावर नियंत्रण ठेवावे. पित्त-विकार बळावू शकतात. किरकोळ अडचणीतून मार्ग काढा. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. तुमच्या धाडसात वाढ होईल. - धनू:-
जुगाराची हौस पूर्ण करता येईल. जबाबदारीची जाणीव लक्षात ठेवावी. हस्त कलेसाठी वेळ काढावा. सामाजिक वादात अडकू नका. सामाजिक बांधीलकी जपावी. - मकर:-
कामातील दिरंगाई टाळावी. खर्चाचा पुनर्विचार करावा. अडथळ्यांतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. मानपमानाचे प्रसंग मनावर घेऊ नका. बोलण्यात लाघवीपणा ठेवाल. - कुंभ:-
सर्वांशी हसून खेळून वागाल. दिवस आळसात घालवाल. मानसिक चंचलता जाणवेल. जवळच्या प्रवासात सावधानता बाळगा. झोपेची तक्रार जाणवेल. - मीन:-
अधिकारी व्यक्तींची गाठ पडेल. बढतीसाठी प्रयत्न करावा. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. कुटुंबात कर्तेपणाचा मान राहील. मुलांवरील खर्च वाढेल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
आजचे राशीभविष्य, शनिवार, ०१ फेब्रुवारी २०२०
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन
First published on: 01-02-2020 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi saturday 01 february 2020 aau