- मेष:-
कामे यथायोग्य पार पडतील. दिवस मनाप्रमाणे घालवाल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. जुनी येणी वसूल होतील. कामाच्या ठिकाणी सतर्क राहावे. - वृषभ:-
जोडीदाराचे वर्चस्व राहील. किरकोळ मतभेद संभवतात. मानसिक स्थैर्य जपावे. अतिविचार करणे टाळावे. उगाचच दुराग्रह करू नका. - मिथुन:-
वैवाहिक सौख्याकडे लक्ष द्यावे. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. जोडीदाराच्या मताचा विचार करावा. मनातील गैरसमज दूर करावेत. चांगला व्यावसायिक लाभ संभवतो. - कर्क:-
कामाची धांदल राहील. घाईने कोणत्याही गोष्टी उरकू नका. मुलांचा व्रात्यपणा वाढू शकतो. मैदानी खेळाची आवड पूर्ण कराल. जोडीदाराची कमाई वाढेल. - सिंह:-
कौटुंबिक गोष्टीत अधिक लक्ष घालावे. जमिनीची कामे तूर्तास करू नयेत. तब्येतीत काहीसा फरक पडेल. क्षुल्लक कारणावरून दुरावा वाढवू नका. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. - कन्या:-
प्रवासात काळजी घ्यावी. नातेवाईकांशी दुरावा वाढू शकतो. जोडीदाराचे मत विरोधी वाटू शकते. अचानक धनलाभ संभवतो. मुलांच्या समस्या जाणून घ्याव्यात. - तूळ:- बोलतांना भान राखावे. अनावश्यक खर्च वाढेल. प्रवासात काहीसा त्रास जाणवेल. नातेवाईकांचे प्रश्न सोडवावे लागतील. हातातील कामावर अधिक लक्ष द्यावे.
- वृश्चिक:-
क्रोधावर नियंत्रण ठेवावे. पित्त-विकार बळावू शकतात. किरकोळ अडचणीतून मार्ग काढा. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. तुमच्या धाडसात वाढ होईल. - धनू:-
जुगाराची हौस पूर्ण करता येईल. जबाबदारीची जाणीव लक्षात ठेवावी. हस्त कलेसाठी वेळ काढावा. सामाजिक वादात अडकू नका. सामाजिक बांधीलकी जपावी. - मकर:-
कामातील दिरंगाई टाळावी. खर्चाचा पुनर्विचार करावा. अडथळ्यांतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. मानपमानाचे प्रसंग मनावर घेऊ नका. बोलण्यात लाघवीपणा ठेवाल. - कुंभ:-
सर्वांशी हसून खेळून वागाल. दिवस आळसात घालवाल. मानसिक चंचलता जाणवेल. जवळच्या प्रवासात सावधानता बाळगा. झोपेची तक्रार जाणवेल. - मीन:-
अधिकारी व्यक्तींची गाठ पडेल. बढतीसाठी प्रयत्न करावा. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. कुटुंबात कर्तेपणाचा मान राहील. मुलांवरील खर्च वाढेल.या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन कराया बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन कराAlready have an account? Sign inसर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठीसबस्क्रिप्शनचे फायदेहजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आजचे राशीभविष्य, शनिवार, ०१ फेब्रुवारी २०२०
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन
First published on: 01-02-2020 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi saturday 01 february 2020 aau