• मेष: जवळचे मित्र भेटतील. कामाचा उत्साह वाढीस लागेल. मनाप्रमाणे गोष्टी घडताना दिसतील. वाहन जपून चालवावे. कर्तेपणाचा मान मिळवाल.
  • वृषभ: घरात कर्तेपणाचा मान मिळवाल. कौटुंबिक सौख्यात रमाल. सर्वांशी गोड बोलाल. धैर्याने कामे हाती घ्याल. किरकोळ दुखापतींकडे लक्ष द्यावे.
  • मिथुन: आपले विचार योग्य पद्धतीने मांडावेत. संसर्गजन्य विकारांपासून सावध राहावे. रागावर नियंत्रण ठेवावे. आकलनशक्तीचा योग्य वापर करावा. चौकसपणा दाखवाल.
  • कर्क: आनंदी दृष्टीकोन ठेवाल. उत्साहाने कामे हाती घ्याल. पित्ताचा त्रास जाणवू शकतो. शारीरिक कष्ट वाढू शकतात. गैरसमज टाळावेत.
  • सिंह: इतरांवर तुमचा प्रभाव पडेल. दिवस मनाजोगा व्यतीत कराल. जुनी प्रकरणे निघतील. चैनीत दिवस घालवाल. क्षणीक सुखाच्या मागे लागू नका.
  • कन्या: मनाजोगी आर्थिक प्राप्ती होईल. मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. मैत्रीत वादाला थारा देवू नका. आर्थिक मान सुधारेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
  • तुळ: काही गोष्टी साध्य करण्यासाठी अधिक खटपट करावी लागेल. कलेला चांगला वाव मिळेल. बदलीची शक्यता आहे. इच्छुकांना बढती मिळू शकेल. चांगली संगत लाभेल.
  • वृश्चिक: मानसिक तणाव दूर सारावा. वरिष्ठांची नाराजी स्वीकारावी लागेल. प्रवास करावा लागेल. गुरुकृपेचा लाभ घ्याल. तुमचे कौतुक केले जाईल.
  • धनु: आध्यात्मिक बाजू बळकट कराल. धार्मिक स्थळांना भेट द्याल. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. मतभेद टाळावेत. विरोधकांपासून सावध राहावे.
  • मकर: अचानक लाभाची शक्यता. पोटाच्या तक्रारी जाणवू शकतात. गृहसौख्य जपावे. सर्वांचा विश्वास संपादन करावा. जुन्या गोष्टी उकरुन काढू नका.
  • कुंभ: जोडीदाराचा वरचष्मा राहील. चांगले वैवाहिक सौख्य अलाभेल. हातातील कामात यश येईल. तुमचा मान वाढेल. कामाचा उरक वाढेल.
  • मीन: चोरांपासून सावध राहावे. चिडचिड वाढू शकते. क्षुल्लक गोष्टींवरून मनस्ताप करून घेवू नये. आत्मविश्वास बाळगावा. संभाषणाची आवड जोपासाल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader