- मेष:-
ध्यानधारणा करावी. मानसिक व्यग्रता जाणवेल. उष्णतेचे त्रास जाणवतील. लिखाणाला चांगली प्रसिद्धी मिळेल. प्रवासाची आवड पूर्ण कराल. - वृषभ:-
भावंडाना मदत करता येईल. सहकाऱ्यांचे प्रश्न जाणून घ्याल. योग्य अंदाज बांधाल. फार विचार करण्यात वेळ घालवाल. समय सुचकता बाळगावी. - मिथुन:-
प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घ्यावे. बौद्धिक हट्ट बाजूला सारावेत. जोडीदाराचा सुस्वभावीपणा लक्षात येईल. विचारांना योग्य वळण द्यावे. रेस, जुगार यातून लाभ संभवतो. - कर्क:-
मुलांच्या वेळा पाळाव्यात. लहानांच्या धडपडीकडे विशेष लक्ष द्यावे. सेववृत्तीने मदत कराल. आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींची गाठ घ्याल. कल्पनेला चांगला वाव मिळेल. - सिंह:-
कौटुंबिक कामात अधिक लक्ष घालावे. जमिनीचे व्यवहार करता येतील. वाहनांची कामे निघतील. अतिविचार अयोग्य ठरेल. मानसिक शांतता जपावी. - कन्या:-
धाडसाने कामे हाती घ्याल. वैवाहिक सौख्यात रमून जाल. पत्नीचा प्रेमळपणा दिसून येईल. घरगुती जबाबदारी वाढेल. नातेवाईकांशी हितगुज कराल. - तूळ:-
उगाच चिडचिड करू नये. क्षुल्लक गोष्टी मनाला लावून घेऊ नका. आत्मविश्वास बाळगावा. कफाचा त्रास जाणवेल. कामाला गतिमानता येईल. - वृश्चिक:-
चौकसपणे वागणे ठेवावे. जुगाराची आवड पूर्ण कराल. स्वभावात काहीसा स्वच्छंदीपणा येईल. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. अभ्यासू दृष्टिकोन ठेवावा. - धनु:-
घरातील वातावरण प्रेमळ असेल. महिला गृहिणीपदाचा मान मिरवतील. कामातील दिरंगाई टाळावी. आध्यात्मावर अधिक लक्ष द्याल. व्यावसायिक लाभ लक्षात घ्यावा. - मकर:-
भावंडांशी सलोखा वाढेल. चांगले साहित्य वाचनात येईल. छंद जोपासायला वेळ काढाल. लहान प्रवास कराल. जुन्या विषयात अडकू नका. - कुंभ:-
गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. आवडी-निवडीवर भर द्याल. लपवण्याकडे कल राहील. अधिकारी व्यक्तींना भेटाल. हौसेला अधिक महत्व द्याल. - मीन:-
भावनेतून विचार कराल. वागण्यातून सज्जनपणा दाखवाल. सर्वांचे आपुलकीने कराल. सरकारी कामात अधिक लक्ष घालावे. कमिशनमधून लाभ होईल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
आजचे राशीभविष्य, शनिवार, ०४ जानेवारी २०२०
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन
First published on: 04-01-2020 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi saturday 04 january 2020 aau