मेष

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रामरक्षेचे पाठ करावेत. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. धाडसी निर्णय घेऊ शकाल. नवीन योजनांचा पाठपुरावा करावा. संततीशी निगडीत. प्रश्न सोडवू शकाल. उत्तम आर्थिक स्थितीचे योग आहेत.
आजचा रंग –गडद निळा

वृषभ

श्री भगवान कॄष्ण यांचे दर्शन घ्यावे. कौटुंबिक समस्या सोडवू शकाल. नातेवार्इकांशी, आप्तेष्ठांशी भेटीचे योग आहेत. बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रवास जपून करावेत.
आजचा रंग – पिवळा

मिथुन

दुर्गा कवच वाचावे. वादविवाद टाळावेत. व्यावसायिक स्पर्धेचे योग आहेत. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक नियोजन योग्य करू शकाल. भावंडांशी वादविवाद टाळावेत.
आजचा रंग –सोनेरी

कर्क

शनि, मारूतीचे दर्शन घ्यावे. आर्थिक नियोजन उत्तम करू शकाल. व्यावसायिकांना आणि नोकरदार मंडळींना उत्तम ग्रहमान आहे. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. आर्थिक नियोजन उत्तम करू शकाल. उत्तम आर्थिक स्थितीचे योग आहेत.
आजचा रंग –लाल

सिंह

गणपती मंदिरामध्ये दानधर्म करावा. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. ग्रहांच्या अनुकूलतेमध्ये व्यावसायिक स्थिरता प्राप्त होर्इल. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. सर्वांशी सुसंवाद होर्इल. वेळेचा योग्य वापर करावा. नियोजनबद्ध दिवसाची आखणी करावी.
आजचा रंग -गुलाबी

कन्या

शनि मंदिरामध्ये तीळाच्या तेलाचा दिवा लावावा. मोठे निर्णय सावधपणे घ्यावे. कुठल्याही कामात दिरंगार्इ नको. प्रवास जपून करावेत. आर्थिक व्यवहारामध्ये दक्षता बाळगावी.
आजचा रंग –हिरवा

तुळ

शनि, मारूती मंदिरामध्ये अन्नदान करावे. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये अनुकूल वातावरण आहे. आर्थिक स्थिरता प्राप्त होर्इल. व्यावसायिक नियोजन उत्तम राहील. कमोडिटी, मार्केट, शेअर्समध्ये अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग -फिक्कट हिरवा

वृश्चिक

मारूती मंदिरात दिवा लावावा. अधिकार संपन्नता येर्इल. उत्तम आर्थिक नियोजन करू शकाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. गुरू बदलाचा लाभ होर्इल. बांधकाम व्यावसायिक, स्थावर मालमत्तेशी निगडीत व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग –नारंगी

धनु

मारूती मंदिरात दिवा लावावा. प्रगतीकारक ग्रहमान आहे. व्यवसाय, नोकरीमध्ये प्रतिष्ठा प्राप्त होर्इल. अनेक नवीन योजना राबविता येतील. वादविवाद टाळावेत. प्रवास जपून करावेत. दूरच्या प्रवासाचे योग आहेत
आजचा रंग –पांढरा

मकर

मारूती मंदिरामध्ये मारूती स्तोत्राचा पाठ करावा. मोठे व्यावसायिक धाडस नको. प्रकृतीची काळजी घ्यावी. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. कमोडिटी, शेअर्स, मार्केट व्यावसायिकांनी सावधपणे गुंतवणूक करावी. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग –मोरपंखी

कुंभ

शनि मंदिरामध्ये दानधर्म करावे. व्यवसायामध्ये अनुकूल ग्रहमान राहील. अडचणींवर मात करू शकाल. नवीन संधी उपलब्ध होतील. पती, पत्नींमधील दुरावा कमी होर्इल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
आजचा रंग- निळा

मीन

दत्त महाराजांना पांढरी फुले अर्पण करून दर्शन घ्यावे. आर्थिक नियोजन सावधपणे करावेत. कुठल्याही स्वरूपाचे वादविवाद टाळावेत. सहकाऱ्यांशी, कामगारांशी सुसंवाद राखावा. मोठे आर्थिक नियोजन करताना सावधानता बाळगावी.
आजचा रंग – आकाशी

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi saturday 06 october