- मेष:-
कर्मठपणे आपले विचार मांडाल. नवीन विचारांची कास धरावी लागेल. जुन्या गोष्टीत अडकून राहू नका. परिस्थितीतून योग्य मार्ग काढाल. बौद्धिक प्रगल्भता दाखवाल. - वृषभ:-
जुन्या दुखाण्यांकडे लक्ष द्यावे. वाहन चालवितांना काळजी घ्यावी. प्रतिकुलतेतून मार्ग काढाल. चटकन निराश होण्याचे कारण नाही. चुकीच्या संगतीत अडकू नका. - मिथुन:-
कामानिमित्त घरापासून दूर राहावे लागेल. वातविकार त्रास देवू शकतात. अतिश्रमामुळे थकवा जाणवेल. जोडीदाराचे विचार जाणून घ्यावेत. आधुनिक विचार करुन पाहावा. - कर्क:-
छुप्या शत्रूंवर विजय मिळवाल. गैरसमजुतीतून वाद वाढू शकतो. सामोपचाराचे धोरण ठेवावे. इतरांमुळे मन:स्ताप वाढू शकतो. सर्दी, खोकला यांसारचे त्रास जाणवू शकतात. - सिंह:-
मनाचा होणारा गोंधळ टाळावा लागेल. ठामपणे निर्णय घ्यावेत. अत्यंत व्यवहारी दृष्टीकोन ठेवाल. चिकाटीने कामे कराल. न्यायी विचार मांडाल. - कन्या:-
घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. पुराणमतवादीपणा दूर करावा लागेल. कामातील चुका टाळण्याचा प्रयत्न करावा. कष्ट अधिक जाणवतील. - तूळ:-
कामाचा विस्तार वाढविता येईल. एक एक करत खर्च वाढू शकतो. कामाची धावपळ वाढू शकते. नातलगांना मदत कराल. दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. - वृश्चिक:-
तुमचे नियोजन योग्य ठरेल. केलेल्या कामाचे चीज होईल. विविध लाभ संभवतात. कामे ठरवल्याप्रमाणे पार पाडण्यावर लक्ष द्यावे. कलेला प्रोत्साहन मिळेल. - धनु:-
कामात कसलीही घाई उपयोगाची ठरणार नाही. चिकाटी सोडू नये, प्रौढपणे आपले मत मांडाल. चटकन निराश होण्याचे कारण नाही. काही कामात अधिक कष्ट घ्यावे लागतील. - मकर:-
योग्य संधीची वाट पहावी लागेल. काही गोष्टींपासून दूर जावेसे वाटू शकते. विलंबाने निराश होवू नका. वातावरणाशी समतोल राखण्याचा प्रयत्न करावा. चोरांपासून सावध राहावे. - कुंभ:-
मित्रमंडळींमध्ये वेळ घालवावा. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक कराल. एकांगीपणा दूर करावा. कष्ट करायला मागेपुढे पाहणार नाही. फार विचार करु नये. - मीन:-
हटवादीपणा करु नये. चुकीच्या कल्पना मनात बाळगू नका. व्यवहारचातुर्य दाखवाल. धार्मिक कामात यश येईल. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
आजचे राशीभविष्य, शनिवार, ०७ सप्टेंबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 07-09-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi saturday 07 september 2019 aau