1. मेष:-
    घरगुती वातावरण प्रसन्न असेल. प्रवासात काळजी घ्यावी. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. व्यवसाय वाढीचा विचार करावा. नवीन मित्र जोडाल.
  2. वृषभ:-
    एकमेकांची बाजू समजून घ्यावी. वडीलधार्‍यांचा विरोध होऊ शकतो. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. हातातील कामात यश येईल. अचानक धनप्राप्ती संभवते.
  3. मिथुन:-
    आवडीचे पदार्थ खाल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. भावनेला आवर घालावी लागेल. वरिष्ठांना नाराज करू नका.
  4. कर्क:-
    कामात चंचलता आड आणू नका. अति भावनाशील होऊ नका. जोडीदाराच्या मताचा विचार करावा. उष्णतेचा त्रास जाणवू शकतो. पोटाची काळजी घ्यावी.
  5. सिंह:-
    जोडीदाराची व्यवहार कुशलता दिसून येईल. मनातील चिंता सतावत राहील. पोटाच्या विकारांकडे दुर्लक्ष करू नका. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. वडीलधार्‍यांचे आशीर्वाद मिळतील.
  6. कन्या:-
    घरातील गोष्टींमध्ये व्यग्र राहाल. प्रेमसंबंध सुधारतील. जोडीदाराची बाजू विरोधी वाटू शकते. मुलांच्या समस्या जाणवतील. जोडीदाराचे हट्ट पुरवावे लागतील.
  7. तुळ:-
    हाताखालील नोकरांचे सहकार्य लाभेल. नसते धाडस अंगाशी येऊ शकते. प्रवासात योग्य खबरदारी घ्यावी. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. कामात चंचलता जाणवेल.
  8. वृश्चिक:-
    हातातील कामात यश येईल. फसवणुकीपासून सावध रहा. मानापमानात अडकू नका. परोपकाराची जाणीव ठेवावी. धार्मिक कामात सहभाग नोंदवावा.
  9. धनु:-
    स्वभावात चिडचिडेपणा येईल. कामातील उत्साह वाढेल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. पित्त-विकार बळावू शकेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
  10. मकर:-
    सामाजिक वादात अडकू नका. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. जुन्या गोष्टी उकरून काढू नका. आरोग्याबाबत सतर्क राहावे. कौटुंबिक बदलाला सामोरे जावे लागेल.
  11. कुंभ:-
    मनमोकळ्या गप्पा माराव्यात. बौद्धिक दृष्टिकोन ठेवाल. प्रत्येक गोष्टीत व्यवहार आड आणू नका. छंद जोपासण्यासाठी वेळ काढावा. झोपेची तक्रार जाणवेल.
  12. मीन:-
    इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. मुलांकडून चांगल्या बातम्या येतील. रेस जुगारातून लाभ संभवतो. स्व‍च्छंदी वृत्तीने वागाल. बौद्धिक चलाखी दाखवाल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader