- मेष:-
जुनी येणी वसूल होतील. आध्यात्मिक बाजू सुधारेल. अचानक धनलाभाची शक्यता. वैचारिक प्रगल्भता दाखवाल. काटकसर कराल. - वृषभ:-
उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदाराचा मान वाढेल. पत्नीचा सुस्वभावीपणा दिसून येईल. चांगले वाहन सौख्य लाभेल. नवविवाहितांच्या अपेक्षा पूर्ण होतील. - मिथुन:-
पोटाचे विकार त्रास देवू शकतात. नातेवाईकांशी मतभेद टाळावेत. कामातून समाधान मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. हाताखालील नोकरांची योग्य साथ मिळेल. - कर्क:-
शैक्षणिक कामात विशेष लक्ष घालावे. ज्ञानाचा योग्य वापर कराल. तर्कनिष्ठ विचार कराल. बौद्धिक छंद जोपासाल. कामात सातत्य ठेवाल. - सिंह:-
सर्व गोष्टी मनासारख्या घडतील अशी अपेक्षा ठेवू नका. उत्तम गृहसौख्य लाभेल. चांगले वाहन सौख्य लाभेल. उष्णतेचा त्रास जाणवू शकतो. कोणाशीही वैर पत्करु नका. - कन्या:-
कलेच्या क्षेत्रात प्रगती करता येईल. अभ्यासू दृष्टीकोन ठेवावा. आवडते पुस्तक वाचायला मिळेल. आशावादी दृष्टीकोन ठेवाल. घरात कर्तेपणाने मिरवाल. - तुळ:-
सांपत्तिक स्थिती सुधारेल. व्यापारीवर्गाला चांगला धनलाभ होईल. व्यावसायीक विस्ताराचा विचार करावा. अंगीकृत कार्यात यश येईल. हातात नवीन अधिकार येतील. - वृश्चिक:-
खर्चाचे गणित नव्याने मांडावे. वायफळ खर्च टाळावा. दिवस मजेत घालवाल. आत्मविश्वास वाढीस लागेल. नवीन अधिकार हातात येतील. - धनु:-
काही गोष्टींपासून दूर राहाल. धर्मिक ग्रंथांचे वाचन कराल. पारमार्थिक उन्नतीचा विचार कराल. खर्चाचा विचार कराल. सामाजिक सेवेत प्रगती कराल. - मकर:-
थोर लोकांचा सहवास लाभेल. मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. काटकसरीने वागाल. व्यवहारी दृष्टीकोन ठेवाल. सांपत्तीक दर्जा सुधारेल. - कुंभ:-
तुमचा मान वाढेल. जोडीदाराचा अधिमान वाटेल. वादाच्या प्रसंगाला सामोरे जावू नका. नवीन अधिकारांची जाणीव ठेवून वागावे. जुन्या गोष्टी उकरुन काढू नका. - मीन:-
कलेतून आर्थिक प्राप्ती होईल. उपासनेत प्रगती करता येईल. संशोधनावर भर द्याल. तुमच्या ज्ञानाचे कौतुक केले जाईल. आध्यात्मिक बाजू बळकट कराल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
आजचे राशीभविष्य, शनिवार, १० ऑगस्ट २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 10-08-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi saturday 10 august 2019 aau