मेष

आज चंद्राचे संमिश्र भ्रमण आहे. उत्तम प्रतिसादाचा दिवस आहे. आज संतती सौख्या लाभेल. महत्त्वाची कामे करताना सावधानता बाळगावी. दत्त महराजांच्या मंदिरात पांढरी फुले अर्पण करुन दर्शन घ्यावे.
आजचा रंग – गडद निळा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वृषभ

आज चंद्राचे संमिश्र भ्रमण आहे. कौटुंबिक सौख्याचा दिवस आहे. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. शनी मंदिरामध्ये दानधर्म करावा.
आजचा रंग – पिवळा

मिथुन

आज चंद्राचे संमिश्र भ्रमण आहे. आज भावंड्याच्या गाठीभेटीचे योग आहेत. प्रवासाचे योग आहेत. महत्त्वाची कामे करताना सावधानता बाळगावी. मारुती मंदिरामध्ये मारुती स्त्रोत्राचा पाठ करावा.
आजचा रंग – नारंगी

कर्क

आज चंद्राचे संमिश्र भ्रमण आहे. आर्थिक निर्णयासाठी दिवस चांगला आहे. कर्ज प्रकरणाचा पाठपुरावा करावा. मारुती मंदिरात दिवा लावावा.
आजचा रंग – लाल

सिंह

आज चंद्राचे संमिश्र भ्रमण आहे. मिश्र प्रतिसादाचा दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांसाठी नवीन कामांसाठी, गाठीभेटीचे योग आहेत. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. मारुती मंदिरामध्ये दिवा लावावा.
आजचा रंग – गुलाबी

कन्या

आज चंद्राचे संमिश्र भ्रमण आहे. व्यवहा जपून करावे. प्रकृतीची काळजी घ्यावी. वादविवाद टाळावेत. महत्त्वाची कामे करताना सावधानता बाळगावी. शनी, मारुती मंदिरामध्ये अन्नदान करावे.
आजचा रंग – हिरवा

तुळ

आज चंद्राचे संमिश्र भ्रमण आहे. संमिश्र प्रतिसादाचा दिवस आहे. सर्व प्रकारचे लाभ मिळतील. ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. महत्त्वाची कामे करताना सावधानता बाळगावी. शनी मंदिरामध्ये तीळ तेलाचा दिवा लावावा.
आजचा रंग – फिकट हिरवा

वृश्चिक

आज चंद्राचे संमिश्र भ्रमण आहे. संमिश्र प्रतिसादाचा दिवस आहे. अधिकारी व्यावसायिकांसाठी चांगला दिवस आहे. नवीन कामांसाठी उत्तम प्रतिसादाचा दिवस आहे. महत्त्वाची कामे करताना सावधानता बाळगावी. गणपती मंदिरामध्ये दानधर्म करावे.
आजचा रंग – नारंगी

धनु

आज चंद्राचे संमिश्र भ्रमण आहे. संमिश्र प्रतिसादाचा दिवस आहे. प्रवास संभवतात. वाहने जपून चालवावी. कामांचा तणाव जाणवेल. आर्थिक आवक चांगली असेल. शनी मारुती दर्शन घेणे.
आजचा रंग – पांढरा

मकर

आज चंद्राचे संमिश्र भ्रमण आहे. संमिश्र प्रतिसादाचा दिवस आहे. प्रवास जपून करावा. प्रकृतीची काळजी घेणे. आर्थिक उलाढाली जपून कराव्यात. वादविवाद टाळावेत. महत्त्वाची कामे करताना सावधानता बाळगावी. दुर्गा कवच वाचावे.
आजचा रंग – मोरपंखी

कुंभ

आज चंद्राचे संमिश्र भ्रमण आहे. संमिश्र प्रतिसादाचा दिवस आहे. व्यवसायात प्रगती कराल. कौटुंबिक सौख्याचा दिवस. महत्त्वाची कामे करताना सावधानता बाळगावी. श्री भगवान कृष्ण यांचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – निळा

मीन

आज चंद्राचे संमिश्र भ्रमण आहे. संमिश्र प्रतिसादाचा दिवस आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी. आर्थिक उलाढाल जपून करावी. महत्त्वाची कामे करतना सावधानता बाळगावी. रामरक्षेचे पाठ करावेत.
आजचा रंग – आकाशी

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi saturday 11 february