- मेष:-
सर्वाना आनंद वाटाल. महत्वकांक्षा जागृत ठेवावी. इतरांना सहृदयतेने मदत कराल. वागण्यातून सुसंस्कृतपणा दिसून येईल. उत्तम वाहनसौख्य लाभेल. - वृषभ:-
अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. महिला सौंदर्य प्रसाधने खरेदी करतील. चांगला आर्थिक लाभ होईल. घरासाठी सजावटीच्या वस्तू खरेदी कराल. इतरांचे मन जिंकून घेण्याचा प्रयत्न कराल. - मिथुन:-
कलेला पोषक वातावरण लाभेल. चांगले साहित्य वाचायला मिळेल. प्रकाशकांना प्रसिद्धी मिळेल. लेखकांना चांगली प्रतिभा लाभेल. धार्मिक वृत्ती जोपासाल. - कर्क:-
काही कामे कमी श्रमात पार पडतील. रेस,सट्टा यातून लाभ संभवतो. सासुरवाडीची मदत मिळेल. विचारांना योग्य वळण द्यावे. सांपत्तिक दर्जा सुधारण्याचा प्रयत्न कराल. - सिंह:-
एकमेकांतील आकर्षक वाढेल. भागदारीच्या कामात यश येईल. संपर्कातून कामे पार पडतील. पत्नीची प्रगती होईल. जोडीदाराशी समजुतीने वागाल. - कन्या:-
आळशीपणा वाढेल. ऐशारामाच्या कल्पना करत बसाल. हाताखालील लोकांचे सौख्य लाभेल. लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. कलागुणांना योग्य वाव मिळण्यासाठी वेळ द्यावा. - तूळ:-
सहवासातून मैत्री वाढेल. स्त्रियांशी मैत्री वाढेल. सहलीचे कार्यक्रम आखाल. अंगीभूत कलेला वाव मिळेल. जुगाराची आवड जोपासाल. - वृश्चिक:-
घरात टापटीप ठेवाल. मोठया वस्तू खरेदी कराल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. सज्जनपणे घरातील वातावरण प्रसन्न ठेवाल. कटुता टाळण्याचा प्रयत्न कराल. - धनु:-
नातलगांशी संबंध सुधारतील. काव्यस्फूर्तीला चांगला वाव मिळेल. कल्पनाशक्तीला चांगली लाभेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. भरभरून कौतुक कराल. - मकर:-
आवाजात गोडवा ठेवाल. चांगले कौटुंबिक सौख्य लाभेल. घरातील वातावरण आनंदी राहील. व्यापाऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळेल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. - कुंभ:-
चारचौघात मिळूनमिसळून वागाल. आनंदी दृष्टीने पाहाल. प्रेमळ मैत्री लाभेल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. नवीन दृष्टिकोन ठेवाल. - मीन:-
मनातील विचित्र कल्पना काढून टाकाव्यात. गुप्तपणे गोष्टी करण्यावर कल राहील. काही गोष्टी इच्छा नसतांना कराव्या लागतील. उगाचच बंधनात अडकल्यासारखे वाटेल. क्षणिक आनंद मिळवाल.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा