मेष

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ॐ परिष्ठाय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत असेल. महत्त्वाचे निर्णय घेत असताना सावधानता बाळगावी. वादविवाद टाळावेत. मोठी आर्थिक उलाढाल सावधपणे करावी. कुटूंबा समवेत जास्तीतजास्त वेळ घालवावा. वाहने जपून चालवावी.
आजचा रंग –राखाडी

वृषभ

ॐ वृषयै नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत असेल. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक नियोजन उत्तम राहील. नोकरदार मंडळींना प्रवासाचे योग संभवतात, प्रगतीकारक ग्रहमान आहेत. कौटूंबिक सौख्य लाभेल. कौटूंबिक कलह कमी होतील. सर्व क्षेत्रामध्ये स्थिरता प्राप्त होईल.
आजचा रंग –पांढरा

मिथुन

ॐ स्वसंवेदनाय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत असेल. महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. कमोडिटी मार्केट, शेअर्स, बांधकाम व्यावसायिकांनी सावधपणे गुंतवणूक करावी. प्रकृतीची काळजी घ्यावी. उष्णतेचे, पचनाचे विकार असलेल्यांनी विशेष दक्षता बाळगावी. वाहने जपून चालवावीत.
आजचा रंग – तपकिरी

कर्क

ॐ रामचंद्राय नमः मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत असेल. धाडसी निर्णय घेऊ शकाल. मोठया निर्णयांचा पाठपुरावा करता येईल. महत्त्वकांक्षी योजना राबविण्याच्या दृष्टीने अनुकूलता प्राप्त होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल. जुने मित्र भेटतील.
आजचा रंग –निळा

सिंह

ॐ निरभेश्वराय नमः मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत असेल. कौटूंबिक सौख्याचा दिवस. आप्तेष्ठांमध्ये आनंदी वेळ जाईल. कुटूंबासमवेत प्रवासाचे योग आहेत. व्यवसाय, नोकरीमध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहेत. बांधकाम, शेती, लोखंडाशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांना आजचे ग्रहमान अनुकूल आहेत.
आजचा रंग -राखाडी

कन्या

ॐ शिवसुताय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत असेल. व्यावसायिक स्पर्धेला सामोरे जावे लागेल. नोकरदार मंडळींनी वरिष्ठांची मर्जी सांभाळून वागावे. विद्यार्थी, गृहिणींना नवीन संधी उपलब्ध होतील. भावंडांच्या गाठीभेटीचे योग आहेत. आप्तेष्ठांमध्ये आनंदी वेळ घालवाल. छोटया प्रवासाचे योग संभवतात.

आजचा रंग –नारंगी

तुळ

ॐ गवाध्यक्षाय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत असेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. जुनी येणी वसूल करता येतील. कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना उत्तम ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल.
आजचा रंग -राखाडी

वृश्चिक

ॐ प्राणदेवताय नमः मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत असेल. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. व्यवसाय, नोकरीमध्ये सुसंधी उपलब्ध होतील. नवीन कामांचा पाठपुरावा करावा. शेती, लोखंड, रसायनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी उत्तम ग्रहमान आहे.
आजचा रंग –पांढरा

धनु

ॐ महेश्वराय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत असेल. मोठे आर्थिक नियोजन सावधानपणे करावेत. सर्वांशी सलोखा ठेवावा. वरिष्ठांची मर्जी राखावी. नोकरदार मंडळींना अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागेल, त्यामुळे चित्त स्थिर ठेवावे. प्रवासामध्ये दक्षता बाळगावी.
आजचा रंग – आकाशी

मकर

ॐ जगदिश्वराय नमः मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत असेल. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. नवीन योजनांचा पाठपुरावा करू शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रवासाचे योग संभवतात. जुने मित्र मंडळी भेटतील.
आजचा रंग – मोरपंखी

कुंभ

ॐ पुर्णानंदाय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत असेल. अधिकार प्राप्त होतील. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. महत्त्वाच्या कामामध्ये तुमचा सहभाग असेल. अधिकारी वर्गांनी सावधपणे निर्णय घ्यावेत. वाहन सौख्य लाभेल.
आजचा रंग- पोपटी

मीन

ॐ सर्वेश्वराय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत असेल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. व्यवसायामध्ये नवीन दिशा मिळेल. जुन्या योजना राबविण्याच्या दृष्टीने ग्रहमान योग्य आहेत. जमिनीशी, पाण्याशी, रसायनांशी निगडीत व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. परदेशाशी निगडीत व्यावसायिकांना उत्तम ग्रहमान आहे.
आजचा रंग –राखाडी

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu