मेष

आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. दगदगीचा दिवस परंतु चांगल्या संधी निर्माण होतील. त्यांचा पाठपुरावा करावा. आर्थिक स्थिती उत्तम राहील. व्यवसायामध्ये प्रगतीकारक वातावरण राहील. धाडसी निर्णय घेताना चर्चा करावी. गणपतीचे आणि मारुतीचे दर्शन घ्यावे. लाल फुले अर्पण करावीत.
आजचा रंग – नारंगी

वृषभ

आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी. महत्त्वाचे निर्णय घेताना सल्ला मसलत करावी. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी लागेल. सहकाऱ्यांशी, कामगारांशी सलोख्याने वागावे. प्रवास जपून करावेत. गुरुचे स्मरण करुन दिवसाची सुरुवात करावी, गुरु मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – हिरवा

मिथुन

आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. व्यावसायिकांना उलाढालीचे योग. व्यवसायाशी निगडित महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. कौटुंबिक सौख्याचा दिवस. कुटुंबासमवेत छोट्या प्रवासाचे योग. परदेशी प्रवासाचे नियोजन करू शकाल. नोकरीमध्ये समाधानकारक वातावरण राहील. दत्त महाराज आणि शनी मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावे.
आजचा रंग – आकाशी

कर्क

आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. नोकरीमध्ये कामाचा तणाव जाणवेल. गृहिणींनी आणि ज्येष्ठांनी उष्णतेच्या विकारांची काळजी घ्यावी. प्रवासाचे योग संभवतात. प्रकृतीची काळजी घ्यावी. आर्थिक नियोजन जपून करावेत. शनी मंदिरात तिळाच्या तेलाचा दिवा लावावा.
आजचा रंग – पिवळा

सिंह

आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. धाडसी निर्णयांचा दिवस. महत्त्वाकांक्षी योजना राबवू शकाल. संतती सौख्य लाभेल. बांधकाम व्यावसायिकांना उत्तम दिवस. ओमकार मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – नारंगी

कन्या

आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. आनंदी ग्रहमान कुटुंबाशी निगडित एखादा महत्त्वाचा निर्णय घ्याल. घरातील ज्येष्ठांचे प्रश्न सोडवू शकाल. राहत्या घरांचे प्रश्न मार्गी लागतील. शनीला तेल अर्पण करावे.
आजचा रंग – गुलाबी

तुळ

आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. भावंडाच्या गाठीभेटीचे योग. आज धाडसी निर्णय घ्याल. महत्त्वाच्या आर्थिक योजनांचा लाभ होईल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. पुरुषसुक्ताचे पाठ करावेत.
आजचा रंग – नारंगी

वृश्चिक

आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. आर्थिक येणी वसूल करण्याच्या दृष्टीने योग्य दिवस. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. शनी मारुती मंदिरात शेंदूर आणि तेल अर्पण करणे.
आजचा रंग – पांढरा

धनु

आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्त्वकांक्षी योजना सुरू करण्यासाठी त्यांची आखणी करण्यासाठी योग्य दिवस. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. ओम शनैश्वराय नमः जप करावा.
आजचा रंग – निळा

मकर

आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. महत्त्वाचे निर्णय घेत असताना सल्ला मसलत करावी. आर्थिक उलाढाली सावधपणे करावी. वाहने चालवताना विशेष काळजी घ्यावी. शनी मारुती मंदिरात तीळ तेलाचा दिवस.
आजचा रंग – तपकिरी

कुंभ

आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. सर्व लाभांच्या दृष्टीने योग्य दिवस. भावंडाच्या गाठीभेटीचे योग. व्यवसायामध्ये अनुकूल ग्रहमान राहील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. मारुती मंदिरात शेंदूर अर्पण करावा.
आजचा रंग – पांढरा

मीन

आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. अधिकारी वर्गासाठी उत्तम दिवस. मोठे निर्णय राबविण्यासाठी चांगले ग्रहमान राहील. प्रवासाचे योग संभवतात. गणपती आणि मारुतीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – पांढरा

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

Story img Loader