- मेष:-
आवक चांगली राहील. मनातील इच्छा पूर्ण होतील. तुमचा अंदाज योग्य असेल. कामाच्या व्यापात गढून जाल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. - वृषभ:-
सामाजिक कामात अग्रेसर रहाल. मोठ्या उलाढाली करण्याचा विचार कराल. स्व पराक्रमावर अधिक भर द्याल. वैवाहिक सौख्याकडे लक्ष द्यावे. धाडसीपणात वाढ होईल. - मिथुन:-
धार्मिक कामात खर्च कराल. पारमार्थिक गोष्टींकडे ओढा वाढेल. गप्पांमध्ये रमाल. फसवणुकीपासून सावधान. मत्सराला बळी पडू नका. - कर्क:-
शारीरिक दगदग वाढू शकते. सट्टे, जुगार यांतून फायदा संभवतो. नाराजीला मनात थारा देवू नये. कामातील अडचणी दूर कराव्यात. निराशा दूर करावी. - सिंह:-
झोपेची तक्रार जाणवेल. मैत्रीचे संबंध अधिक दृढ होतील. महत्वाची कागदपत्रे जपून ठेवावीत. मनाजोगे काम करता येईल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. - कन्या:-
नातेवाईकांची मदत मिळेल. चांगली कमाई होईल. लाभाकडे लक्ष द्यावे. वयस्कर मित्र भेटतील. व्यावसायिक वाढीचा विचार कराल. - तुळ:-
दलालीच्या कामातून फायदा संभवतो. उपासनेला बळ मिळेल. वायदा पूर्ण करावा. मनातील इच्छा पूर्ण होतील. खटपटीला यश येईल. - वृश्चिक:-
कामाचा दर्जा सुधारेल. चांगले वाहन सौख्य लाभेल. संकोच करू नये. कामात जाणीवपूर्वक बदल कराल. इर्षेने कामे हाती घ्याल. - धनु:-
लिखाणातून फायदा संभवतो. एजन्सीच्या कामात यश येईल. काही चांगल्या गोष्टींना वेळ द्यावा. स्वबळावर विश्वास ठेवावा. प्रवासात काळजी घ्यावी. - मकर:-
पत्नीकडून धनलाभ संभवतो. भागीदारीतून पैसा मिळेल. कौटुंबिक सौख्याला प्राधान्य द्याल. आरोग्याची काळजी घ्यावी. वैवाहिक सौख्य चांगले लाभेल. - कुंभ:-
गैरसमजाला मनात थारा देवू नये. भागीदारीतील प्रश्न सामोपचाराने सोडवावेत. बौद्धिक दृष्टीकोन ठेवाल. वैवाहिक सौख्याचा आनंद टिकवून ठेवावा. राग आवरता घ्यावा. - मीन:-
मानसिक स्थैर्य जपावे. विचारांच्या गर्दीत वाहून जावू नये. मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे. किरकोळ दुखापतींपासून सावध राहावे. चहाडखोर व्यक्तींपासून दूर राहावे.आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर कराAlready have a account? Sign in– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
First published on: 17-08-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi saturday 17 august 2019 aau