मेष

आज चंद्राचे भ्रमण मेष राशीला कौटुंबिक सौख्य प्रदान करणारे ठरणार आहे. नोकरीच्या कामांमध्ये दगदग होण्याची शक्यता आहे. त्यांचा ताण येऊ न देता वरिष्ठांशी सुसंवाद ठेवावा. गणपतीचे आणि मारुतीचे दर्शन घ्यावे. लाल फुले अर्पण करावी.
आजचा रंग – आकाशी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वृषभ

पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा लाभ होईल. नवीन योजनांची अंमलबजावणी करता येईल. स्पर्धांमध्ये खंबीरपणे उभे राहू शकाल. गुरुचे स्मरण करुन दिवसांची सुरुवात करावी. गुरू मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – लाल

मिथुन

कर्क राशीतील चंद्राचे भ्रमण मिथुन राशीला भाग्यकारक ठरणार आहे. आज जुन्या ओळखीच्या लोकांच्या भेटी-गाठी होण्याची शक्यता आहे. दत्त महाराजांचे आणि शनी महाराजांचे मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे.
आजचा रंग – आकाशी

कर्क

मोठ्या प्रवासाचे योग येतील, कुटुंबासमवेत, मित्र मंडळीसोबत चांगला वेळ जाईल. महत्त्वाच्या लोकांच्या भेटी-गाठी होतील. शनी मंदिरात तीळाच्या तेलाचा दिवा लावावा.
आजचा रंग – निळा

सिंह

दगदगीच्या प्रवासाचे योग आहेत. कुठलीही चिडचिड न करता कामांची सुरुवात करावी. ओमकार मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – राखाडी

कन्या

योग्य लाभाचा दिवस, पूर्वी प्रयत्न केलेल्या कामांचा लाभ मिळण्याची शक्यता. आज गुरु आणि वरिष्ठांना नमस्कार करुन दिवसाची सुरुवात करावी. शनीला तेल अर्पण करावे.
आजचा रंग – तपकिरी

तुळ

भविष्यातील योजनांची आखणी करू शकाल. कुटुंबासाठी योग्य निर्णय घ्याल. एखाद्या छोट्या सहलीचे नियोजन करू शकाल. पुरुष सुक्ताचे पाठ करावेत.
आजचा रंग – आकाशी

वृश्चिक

वरिष्ठांची मर्जी राहील. तुम्हाला अपेक्षित असलेला मान सन्मान मिळेल. घरातील वातावरण सुखकारक राहील. छोट्या प्रवासाचे योग येतील. शनी-मारुती मंदिरात शेंदूर आणि तेल अर्पण करावे.
आजचा रंग – नारंगी

धनु

आज दिवस कुटुंबासोबत घालवावा. मोठे प्रवास करणार असाल तर काळजीपूर्वक करावेत. पूर्ण तयारी करावी. नवीन कामांची सुरुवात करू नये. प्रकृतीची पोटाच्या विकारांची काळजी घ्यावी. अभ्यंग स्नान करावे. ओम शनैश्वराय नमः जप करावा.
आजचा रंग – तांबडा

मकर

आज महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. लांबचे प्रवास टाळावेत. फार दगदग होईल अशी कामे करू नये. चित्त स्थिर ठेऊन कुटुंबासोबत वेळ घालवावा. अभ्यंग स्नान करावे. शनी मंदिरात तीळ तेलाचा दिवा लावावा.
आजचा रंग – तपकिरी

कुंभ

आज प्रवासाचा ताण जाणवण्याची शक्यता आहे. तब्येतीची काळजी घेऊन प्रवास करावेत. वाहनांवर नियंत्रित वेग ठेवावा. वाहनांची तपासणी पूर्ण करावी. निष्काळजी राहू नये. मारुती मंदिरात शेंदूर अर्पण करावा.
आजचा रंग – नारंगी

मीन

आजचा दिवस लहान मोठ्या सहलीचा असेल. प्रवासात काळजी घ्यावी. पोटाच्या विकारांपासून जपावे. व्यावसायिकांना परदेशी व्यापाराची संधी उपलब्ध होऊ शकते. गणपती आणि मारुतीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – नारंगी

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi saturday 17 december